
राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्या चे जिल्हा धिकारी मा. श्री. आशिष येरेकर साहेब यांनी शनिवार, दि. 7 फेब्रुवारी 2026 रोजी गाविलगड किल्ल्याची पाहणी व पदभ्रमंती केली.
सकाळी 6 वाजता मोझरी गावातून पदभ्रमंतीला सुरुवात करण्यात आली. पदभ्रमंती करून सकाळी 9 वाजता सर्व अधिकारी किल्ल्यावर पोहोचले. यावेळी जिल्हाधिकारी महोदयांनी गाविलगड किल्ल्याचा इतिहास, भौगोलिक रचना व संवर्धनाबाबत सविस्तर माहिती घेतली.
या प्रसंगी अचलपूरचे उपविभागीय अधिकारी मा. श्री. बळवंत अरकराव, चिखलदऱ्याचे तहसीलदार मा. श्री. जीवन मोरोनकर, अचलपूरचे तहसीलदार मा. श्री. सुदर्शन सहारे, चिखलदरा नायब तहसीलदार श्री. सुधीर धावडे, प्रवीण काळे व तुषार बुरघघाटे (अचलपूर), चिखलदरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. श्री. धीरज गोहाळ, DCF मा. श्री. अग्रिम सैनी, DFO मा. श्री. अनंत डिगोडे, ACF मा. श्री. अक्षय तळपे, RFO मा. श्री. युवनाते, वनपाल श्री. विनोद कासदेकर, तसेच वनरक्षक श्री. मयूर सानप, मलवार, बोरकर व मनीष ढाकुलकर आणि वनविभागाची संपूर्ण टीम उपस्थित होती.
यावेळी शिवा काळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना गाविलगड किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा, त्याचे महत्त्व व संरक्षणाची गरज याबाबत सविस्तर माहिती दिली
तसेच श्री मनीष ठाकूर कर यांनी जंगलातील व किल्ल्यामधील पक्ष्यांची माहिती दिली
ही पदभ्रमंती ऐतिहासिक वारसा जतन व पर्यटन विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली आहे.