
अकोट
ता . प्रतीनिधी
रामेश्वर कावरे उमरा
उमरा : येथील पीएम श्री शाळेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात व आदरपूर्वक साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक अय्युब चौधरी,सर शिवदास मोरे सर, नालिंदे मॅडम, अस्वार मॅडम, जाधव मॅडम, गिते मॅडम, निशिका केदार, अनुराधा येऊल वनमाला केदार आदी शिक्षक व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान डॉ. आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. शिक्षण, समानता आणि सामाजिक न्याय यांसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प करत जयंती उत्साहात साजरी केली.