
तेल्हारा प्रतिनिधी :- तेल्हारा हद्दीत समाविष्ट करण्यात आलेल्या प्रभाग क्र.१ मधील पाढरी या भागातील नागरिकांच्या मालमत्ता हस्तांतरणाच्या कामात अडथळा आनने म्हणजे शंभर टक्के दलित वस्ती असलेल्या नागरिकांवर अन्याय आहे आणि तो खपवून घेतल्या जाणार नाही या करिता तेल्हारा नगरपालिकेच्या अध्यक्षा व मुख्याधिकारी यांनी या गंभीर विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशा प्रकारची मागणी नगरसेविका कान्होपात्रा रामभाऊ फाटकर यांनी १७ एप्रिलला दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
पाढरी हा भाग तेल्हारा शहरात प्रभाग क्रमांक १ मध्ये समाविष्ट करण्यात आला या भागामध्ये शंभर टक्के अनुसूचित जाती प्रवर्गातील गरीब नागरिक राहतात या भागातील नागरिकांच्या मालमत्ता हस्तांतरित करण्यात याव्यात या बाबत नगरसेविका कान्होपात्रा फाटकर यांनी लेखी पत्राद्वारे नगर पालिकेकडे मागणी केली त्या नुसार पालिका मुख्याधिकाऱ्यांनी मालमत्ता हस्तांतरण करण्यात याव्यात या करिता संबंधित कर्मचाऱ्यांना आपल्या आदेशानुसार पांढरी येथे पाठवण्यात आले होते परंतु पांढरी येथील मालमत्ता हस्तांतरणाचे जे काम चालू असताना कोणीतरी मध्येच अडथळा निर्माण करून संबंधित कर्मचाऱ्यांना काम करू दिले नाही व त्यांना परत बोलाविले हे नागरिकांचे कामे होऊ न देण्याचे षडयंत्र रचल्या जात आहे .
हद्द वाढीच्या निर्णयानुसार सदर क्षेत्राचा समावेश तेल्हारा नगरपरिषद हद्दीत करण्यात येऊन तो प्रभाग क्रमांक १ मध्ये अंतर्भूत करण्यात आलेला आहे.
मात्र अद्यापपर्यंत पाढरी भागातील नागरिकांच्या मालमत्ता नोंदी कोठा ग्रामपंचायतीकडून तेल्हारा नगरपरिषदेकडे विधिवत हस्तांतरित झालेल्या नाहीत. परिणामी, संबंधित नागरिकांना मालमत्ता कर नोंदणी, नाव फेरफार, बांधकाम परवानगी, घरकुल चा लाभ घेता येत नसून विविध शासकीय योजनांचा लाभ तसेच इतर प्रशासकीय बाबींमध्ये अडचणींचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे पाढरी भागातील सर्व संबंधित मालमत्ता नोंदी, अभिलेख व कागदपत्रे कोठा ग्रामपंचायतीकडून तेल्हारा नगरपरिषदेकडे तात्काळ हस्तांतरित करण्याबाबत आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी, जेणेकरून संबंधित नागरिकांची कामे सुरळीतपणे मार्गी लागतील अशी रास्त मागणी यापूर्वी सुद्धा करण्यात आली असता मुख्याधिकारी यांच्या सूचनेनुसार संबंधित कर्मचाऱ्यांमार्फत मालमत्ता हस्तांतरणाबाबतचा सर्वे चालू असताना कुणीतरी अडथळे निर्माण करीत असल्याचे दिसून आले आहे त्यामुळे हा शंभर टक्के दलित वस्ती असलेल्या पांढरी भागातील गरीब नागरिकांवर अन्याय होत असून ही बाब मानवतेच्या दृष्टिकोनातून चुकीचे होत आहे ही बाब गंभीर असून पालिका अध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी गांभीर्याने विचार करावा तसेच या भागातील नागरिकांना मूलभूत सुविधांसह सार्वजनिक शौचालय ,स्मशानभूमी नाल्या, रस्ते ,गटारी ,पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था ( कारण सध्या कोठा ग्रामपंचायतवर अवलंबून आहोत ) अंगणवाडी, बुद्ध विहार, सभागृह इत्यादी सुख सुविधा पुरविण्यात याव्यात अशा प्रकारची मागणी निवेदनाद्वारे नगरसेविका कान्होपात्रा फाटकर यांनी केली आहे. या गंभीर विषयाबाबत नगराध्यक्षा व मुख्याधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.