
तेल्हारा ता. (प्रतिनिधी): नंदकिशोर नागपुरे
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त तेल्हारा शहरात अखिल भारतीय माळी महासंघ तालुका शाखेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अत्यंत उत्साहात आणि भव्य स्वरूपात जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या शिस्तबद्ध मोटारसायकल रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
भव्य रॅली आणि महामानवांना अभिवादन

रॅलीची सुरुवात स्थानिक महात्मा फुले चौक येथून करण्यात आली. यावेळी शेकडोच्या संख्येने समाजबांधव पिवळे फेटे परिधान करून सहभागी झाले होते. रॅलीच्या अग्रभागी ट्रॅक्टरवर महात्मा फुले यांचे आकर्षक तैलचित्र आणि मधुर वाद्यांच्या गजराने वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते.
रॅली दरम्यान महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला, तसेच टावर चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या रॅलीमध्ये महिला भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती, विशेषतः पिवळ्या साड्या परिधान केलेल्या महिलांमुळे रॅलीची शोभा अधिकच वाढली होती. संपूर्ण शहरातून मार्गक्रमण करत या रॅलीची सांगता भागवत मंगल कार्यालय येथे करण्यात आली.
विचार सभा आणि मान्यवरांची उपस्थिती
रॅलीच्या समारोपानंतर भागवत मंगल कार्यालय येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी अकोला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. संगीताताई अढाऊ होत्या.
व्यासपीठावरील प्रमुख अतिथी:
यावेळी को-ऑपरेटिव्ह बँकेचे नवनियुक्त संचालक संदीपदादा खारोडे, माजी आमदार बळीरामजी शिरस्कार, अ.भा. माळी महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस ॲड. श्रीकांतजी तायडे, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष सुभाषभाऊ भड, वंचित बहुजन आघाडीचे सिद्धार्थजी शामस्कार, काँग्रेस तालुकाध्यक्ष गजाननभाऊ वानखडे प्रकाश राऊत सर गोपाल राऊत प्रकाश भाऊ उगले मधुसूदन भाऊ बरिंगे संदिप देशमुख जिवन भाऊ बोदडे प्राचार्य अरविंदजी गिऱ्हे अरविंदजी उमाळे महिला आघाडीच्या प्रीतीताई तायडे साधनाताई भोपळे सिंधुताई वानखडे सुनिताताई गिऱ्हे अखिल भारतीय माळी महासंघाचे तालुका अध्यक्ष हरिदास भाऊ भोपळे जिल्हा प्रतिनिधी शंकरराव गिऱ्हे समता परिषदेचे गजानन भाऊ म्हैसने पालकर सर विनोद भाऊ मिरगे यांसह राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते.
मार्गदर्शन आणि मनोगत
सभेमध्ये सौ. संगीताताई अढाऊ, शत्रुघ्नजी बिरकड आणि सौ. प्रमिलाताई वानखडे यांनी आपले विचार मांडले. महात्मा फुले यांनी समाजासाठी, विशेषतः शिक्षण आणि स्त्री हक्कासाठी दिलेल्या योगदानावर यावेळी प्रकाश टाकण्यात आला.कार्यक्रमात अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनियुक्त संचालक संदिप भाऊ खारोडे, हिवरखेड नगरसेवक श्यामशीलजी भोपळे,वंदनाताई राजेश वानखडे तेल्हारा नगरसेवक पंचफुला ताई कवर आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका प्रमिलाताई वानखडे सामाजिक योगदानाबद्दल ओमप्रकाश वेरूळकर निलेश सानप सर आदींचा मान्यवराचे हस्ते सत्कार करण्यात आला.
”महात्मा फुले यांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत. शिक्षण हेच प्रगतीचे मुख्य साधन आहे, हा त्यांचा संदेश आपण घराघरात पोहोचवला पाहिजे,” असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.कार्यक्रमासाठी नियोजन अरुण भाऊ म्हसाळ, सजावट छोटुभाऊ बोंबटकर, ट्रॅक्टर व साऊंड हेमंत नागपुरे अनुराग बगाडे निलेश उमाळे राजू उमाळे निलेश इंगळे यांनी परिश्रम घेतले
कार्यक्रमाचे बहारदार संचालन सचिन ठोमरे सर यांनी केले, पाहुण्यांचा परिचय ओमप्रकाश उगले यांनी तर प्रास्ताविक ॲड. श्रीकांत तायडे यांनी मांडले.उपस्थितांचे आभार प्रशांत खाडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व समाजबांधवांसाठी सुग्रास भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय माळी महासंघाचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि तरुणांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला तेल्हारा तालुक्यातील नागरिक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.