
राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात काॅग्रेस अमरावती जिल्हा अध्यक्षासाठी संगठन सुजन अभियानाचा कार्यक्रम घेण्यात आला आहे.
त्याच प्रमाणे मेळघाट विधानसभा क्षेत्रात पण चिखलदरा तालुक्यातील सेमाडोह येथिल संकुल येथे हा कार्यक्रम दि.१७/४/२०२६ ला राबविण्यात आला असून या कार्यक्रमात मेळघाटातील बहुसंख्येने काॅग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या संगठन सुजन अभियानात सर्वानुमते अमरावती काॅग्रेस जिल्हा अध्यक्षासाठी बबलु भाऊ देशमुख या नावाचा ठराव पारीत करण्यात आले आहे.
तसेच याच कार्यक्रमात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी चिखलदरा अध्यक्ष रामलाल काळे व काटकुंभ ग्रामपंचायत चे सरपंच ललीता बेठेकर यांनी बबलु भाऊ देशमुख यांच्या हस्ते काॅग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
या कार्यक्रमात उपस्थित म्हणून हरीयानाचे आमदार अहमद साहेब,खाडे साहेब,बबलु भाऊ देशमुख, माजी आमदार राजकुमार पटेल,दयाराम काळे, महेंद्रसिगं गैलवार, रोहित पटेल, राहुल येवले, सहदेव बेलकर,संजय बेलकर,पंकज मोरे,विलास बोरेकर, राजेश सेमलकर,पियुष मालविय, रजनीताई, महिपालसिंग उईके,किशोर झारखंडे, प्रकाश जामकर,रामजी सावरकर व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.