
तेल्हारा प्रतिनिधी : तेल्हारा तालुक्यातील तेल्हारा–अडसूळ मार्गावर आज भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, चारचाकी वाहन तेल्हारा कडून अडसूळकडे जात होते, तर दुचाकी तेल्हाराकडे येत होती. यावेळी समोरासमोर झालेल्या धडकेत अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा पूर्णपणे चुराडा झाला, तर चारचाकी वाहनाच्या पुढील भागाचेही मोठे नुकसान झाले.
या दुर्घटनेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेला प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी अकोला येथे हलवण्यात आले आहे.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी त्वरित मदतकार्य करत जखमींना बाहेर काढले व प्रशासनाला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे.
तिहेरी अपघातात जऊखेड येथील अंदाजे 17 वर्षीय तरुण तर दसरखेड येथील अंदाजे 17 वर्षीय तरुणी यांचा समावेश आहे.
मुलगा जागेवरच गतप्राण तर मुलीची कंबर व पाय फॅक्चर मुलगी अकोला रेफर व मोठया फोर व्हीलर गाडीमधील पती पत्नी देखील जखमी त्यांना देखील अकोला रिफर करण्यात आले जेव्हा पल्सर व अल्टो गाडीचा अपघात झाला अल्टोच्या मागून येणारा वडगाव येथील 55 वर्षीय व्यक्ती गाडीवर धडकला व त्याच्या देखील डोक्याला दुखापत झाली .
वाढते अपघात चिंतेचा विषय
तेल्हारा तालुक्यात वाढत्या अपघातांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन, निष्काळजीपणे वाहन चालवणे आणि रस्त्यांची स्थिती ही अपघातांची प्रमुख कारणे असल्याचे समोर येत आहे. प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याची मागणी होत आहे.