
रामेश्वर कावरे अकोट: तालुका प्रतिनिधी
उमरा
कार्यक्रमात आरोग्य विभागातील सर्व डॉक्टर, अंगणवाडी सेविका, आशा व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपस्थितांनी त्यांच्या विचारांना अभिवादन करत समाजातील समता, शिक्षण आणि सामाजिक न्याय यांचा संदेश आत्मसात करण्याचा संकल्प केला.
यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी बाबासाहेबांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या आदर्शांचा अवलंब करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमात अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या व मदतनीस यांनी सक्रिय सहभाग नोंदवत जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी केली.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्र येऊन समाजहितासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.