
रामेश्वर कावरे
अकोट ता: प्रतिनिधी
लाळेगाव, उमरा, मक्रंपुर व बेलुरा या परिसरात पोलीस पाटील म्हणून कार्यरत असलेल्या मोहिनी दादाराव भंडारे या आपल्या कर्तव्यदक्ष व जनतेशी निगडीत कामामुळे सध्या चर्चेत आहेत. अत्यंत जबाबदारीने व तत्परतेने त्या आपले कर्तव्य पार पाडत असून, गावकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
गावातील रहिवाशी दाखले, शासकीय कागदपत्रे, प्रमाणपत्रे यांसारखी कामे असोत किंवा नागरिकांमधील भांडण-तंटे मिटविण्याचे प्रसंग असोत, मोहिनी भंडारे या प्रत्येक वेळी वेळेवर उपस्थित राहून योग्य तो निर्णय घेतात. त्यामुळे अनेक वाद मोठ्या स्वरूपात जाण्यापूर्वीच शांततेत मिटवले जात आहेत.
विशेष म्हणजे, महिलांनी जबाबदारीची पदे सक्षमपणे सांभाळू शकतात याचे जिवंत उदाहरण त्यांनी उभे केले आहे. त्यांच्या कार्यामुळे गावात कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होत असून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
गावकऱ्यांच्या मते, “कोणतेही काम असो, मोहिनी ताई लगेच प्रतिसाद देतात. त्यांच्यामुळे अनेक अडचणी सोप्या झाल्या आहेत.” अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.
स्त्री शक्तीचा हा प्रेरणादायी चेहरा म्हणून मोहिनी दादाराव भंडारे यांना सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कार्याला मनापासून सलाम केला जात आहे.