
हिवरखेड प्रतिनिधी :-
दिनांक २०.०४.२०२६ रोजी हिवरखेड ठाणेदार, गजानन राठोड पोलीस स्टेशन हिवरखेड जि. अकोला यांना सकाळी ०७.०० वाजताचे दरम्यान फोनव्दारे माहिती मिळाली की, आरोपी दिपक चतुरकार याने हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बेलखेड येथे स्वतःचे वडील नामे रामदास चतुरकार (वय अंदाजे 75) यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन जिवानिशी ठार केले व आरोपी दिपक रामदास चतुरकार हा फरार झाला आहे. अशी माहिती मिळाल्यावरुन तात्काळ हिवरखेड ठाणेदार गजानन राठोड व पोलीस स्टाफ यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला पकडण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक गोपाल गिलबिले, पोलीस प्रफुल पवार, प्रमोद चव्हाण यांचे एक पथक तयार केले. व त्यांना ठाणेदार साहेबांनी योग्य ते मार्गदर्शन करुन आरोपीला तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले. नमुद पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी गुप्त बातमीदार नेमुण आरोपी हा दहिगांव फाटा ते पंचगव्हाण फाटा येथुन पळुन जात असतांना त्यास शिताफीने घटना घडल्याच्या दोन तासाच्या आत ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन हिवरखेड येथे आणले.
सदर प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु असुन सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेडडी, सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी निखील पाटील यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार गजानन राठोड हे करीत आहेत.