
अनंता मतेतालुका प्रतिनिधी अंजनगाव सुर्जी अंजनगाव सुर्जीअंजनगाव सुर्जी येथे बुधवारी 18 फेब्रुवारी तहसील कार्यालय पार पडलेला जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रम हा प्रत्यक्षात अधिकाऱ्यांच्या औपचारिक बैठकी पुरताच मर्यादित राहिल्याची तीव्रचर्चा तालुक्यात रंगू लागली आहे. नागरिकांच्या प्रलंबित तक्रारीचे निवारण करण्यासाठी आणि विकास कामांना आढावा घेण्यासाठी शासनाने दिलेल्या आदेशानुसार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात जनतेलाच कार्यक्रमाची माहिती नसल्याने हा प्रकार प्रशासनाच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे करणारा ठरला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार महसूल विभागातर्फे तहसील स्तरावर पंचायत समिती, नगरपालिका व इतर विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली हा उपक्रम मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत राबविण्यात येत असल्याचे सांगितले गेले परंतु ज्या अभियानाचा उद्देश तळागळातील नागरिकांपर्यंत पोहोचणे आहे त्याच कार्यक्रमात नागरिकांचा सहभागच नसणे ही प्रशासनाची गंभीर चूक आहे