
तेल्हारा ता. प्रतिनिधी नंदकिशोर नागपुरे
येथील जिल्हा परिषद शाळेत श्री गुरुदेव सेवा मंडळ दानापूर आणि ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘बाल सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. १२ मे रोजी सायंकाळी ७ वाजता गावातील प्रतिष्ठित नागरिक व मान्यवरांच्या उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
दिप प्रज्वलन व उद्घाटन:
कार्यक्रमाची सुरुवात सामुदायिक प्रार्थनेने झाली. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज आश्रम मोझरीचे उपसर्वाधिकारी श्री बाबाराव पाटील यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दानापूर ग्रामपंचायतीच्या प्रशासक सौ. सपनाताई वाकोडे होत्या.
मान्यवरांची उपस्थिती:
यावेळी मंचावर हभप श्री शिवदास महाराज गाडेकर, अकोला जिल्हा प्रचारप्रमुख श्री इंगळे गुरुजी, तेल्हारा तालुका सेवाधिकारी ॲड. अजित सेंगर, मध्यवर्ती प्रतिनिधी वसंतराव वाघमारे, श्री शेलोटकर गुरुजी, तलाठी अंकुश मानकर, उपसरपंच सागर ढगे, तंटामुक्त समिती अध्यक्ष अफसर खाँ बिस्मिल्ला खाँ, आणि माजी मुख्याध्यापक श्री येवतकार गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिबिरातील उपक्रम व प्रशिक्षण:
शेलोटकर गुरुजी, इंगळे गुरुजी, ॲड. अजित सेंगर आणि अभिजित इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो विद्यार्थ्यांना दैनंदिन प्रशिक्षण दिले जात आहे. यात प्रामुख्याने:
कला व क्रीडा: तबला, हार्मोनियम, टाळ, लाठी-काठी आणि भजन.
मूल्यशिक्षण: अध्यात्म, देशभक्ती, मातृ-पितृ भक्ती, व्यसनमुक्ती आणि चारित्र्य संवर्धन.
उद्घाटकांचे विचार:
उद्घाटक बाबाराव पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले की, “या कोवळ्या कळ्यांमध्येच उद्याचे ज्ञानेश्वर आणि शिवाजी महाराज दडलेले आहेत. आजच्या भरकटलेल्या पिढीला सुसंस्कारांची नितांत गरज आहे. तुकडोजी महाराजांचे अध्यात्म हे २४ कॅरेट सोन्यासारखे शुद्ध असून, या शिबिरातून मुलांनी आपल्या जीवनाचे सार्थक करावे.व्यवस्था व सहकार्य:
शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांसाठी ग्रामस्थांच्या सहकार्याने सकाळ-संध्याकाळ अल्पोपहार, दूध आणि अन्नदानाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. अजित सेंगर यांनी केले, प्रास्ताविक माणिकराव इंगळे गुरुजी यांनी मांडले, तर आभार श्रीकांत यवतकार गुरुजी यांनी मानले या सोहळ्याला गणपतराव रौंदळे, वासुदेवराव येउल, रामचंद्र वाघमारे, माणिकराव वाघमारे, गोपाल झुने, पत्रकार संजय हागे,पद्माकर लाहोडे,वसंत टाले,गणेश दांदळे,धम्मपाल वाकोडे, शालिग्राम झाडोकार, तायडे दादा,यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महिला आणि युवक उपस्थित होते. श्री गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत