
तेल्हारा ता:(प्रतिनिधी) नंदकिशोर नागपुरे
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि महाराजांचे अस्तिस्मारक असलेल्या दानापूर या संस्कार भूमीत, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ (श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम) अंतर्गत श्री गुरुदेव सेवा मंडळ दानापूर व समस्त ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने सर्वांगीण बाल सुसंस्कार
शिबिरा’चे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दिनांक १२ मे ते २३ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे.
शिबिराचा उद्देश
”हम भारत की शान है, वीरों की संतान है!” ही दृढवृत्ती बालमनावर रुजावी, तसेच नवीन पिढीमध्ये संस्कार, संस्कृती आणि प्रखर राष्ट्रनिष्ठा वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने या ‘संस्कारयज्ञा’चे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या स्वप्नातील ‘सुंदर भारत’ घडवण्यासाठी मुलांमध्ये शिस्त आणि नैतिक मूल्यांची जोपासना करणे हा या शिबिराचा मुख्य हेतू आहे.
ग्रामस्थांचा लोकसहभाग
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी दानापूर येथील ग्रामस्थ तन, मन आणि धनाने सातत्याने सहकार्य करत आहेत. गावातील हा सामूहिक उपक्रम केवळ शिबिर नसून तो एक ज्ञानयज्ञ असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे.
प्रवेशासाठी आवाहन:
या संस्कार ज्ञानयज्ञामध्ये परिसरातील पालकांनी आपल्या पाल्यांना मोठ्या संख्येने सहभागी करून घ्यावे. या माध्यमातून पाल्यांचे आणि पर्यायाने कुटुंबाचे जीवन उन्नत व्हावे, असे आवाहन श्री गुरुदेव सेवा मंडळ व दानापूर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
ठळक बाबी:
कालावधी: १२ मे ते २३ मे २०२६
स्थळ: दानापूर (जि.प.वरिष्ठ शाळा (मुले)
आयोजक: श्री गुरुदेव सेवा मंडळ, दानापूर व ग्रामस्थ.