
विदर्भ एक्सप्रेस न्युज अकोट तालुका प्रतीनिधी रामेश्वर अंबादासजी कावरे उमरा ता अकोट जि अकोला
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागांतर्गत आयोजित करण्यात आलेले “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” उमरा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. लोकमान्य विद्यालय उमरा येथील क्रीडा मैदानावर आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी (एसडीओ), तहसीलदार, उप नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी भूपेंद्र चौबे, ग्राम महसूल अधिकारी संजय तायडे, ग्राम महसूल अधिकारी लांडगे, ग्राम महसूल अधिकारी अवारे, ग्राम महसूल अधिकारी गुजरकर, ग्राम महसूल अधिकारी वाळके तसेच कोतवाल कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय तलाठी, कृषी सहाय्यक, परिसरातील गावांचे सरपंच, सदस्य, पोलीस पाटील, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षक वृंद तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील पत्रकार बांधवांनीही कार्यक्रमाचे वृत्तांकन केले.
शिबिरामध्ये उमरा व परिसरातील गावांमधून आलेल्या नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. महसूल विभागाच्या विविध सेवा, दाखले, फेरफार, शासकीय योजना, शेतकरी नोंदणी आदी कामांसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला.
कार्यक्रमात आलेल्या सर्व नागरिकांसाठी भोजनाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. व्हेज पुलाव तसेच आरओच्या थंड पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. उपस्थित नागरिकांनी शासनाच्या या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी महसूल विभाग, ग्रामपंचायत, शाळा संचालक, पत्रकार बांधव तसेच गावातील विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.