
तेल्हारा ता. प्रतिनिधी नंदकिशोर नागपुरे
संघटन सृजन अभियानांतर्गत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निरीक्षकांनी जिल्हास्तरावर प्रत्यक्ष भेटी देऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. या दौऱ्यात प्राप्त झालेल्या अहवालाची दखल घेत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष मा. श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या मान्यतेने संघटनेत नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
या अंतर्गत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) विभागाच्या तेल्हारा तालुका ग्रामीण ब्लॉक अध्यक्षपदी श्री. विनोद लक्ष्मण झुबंळे यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे.
काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी ही निवड करण्यात आली असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. विनोद झुबंळे यांच्या निवडीबद्दल तालुक्यात त्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागात पक्षाची बांधणी अधिक घट्ट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या नियुक्तीबद्दल श्री. विनोद झुबंळे यांनी पक्षश्रेष्ठींचे मा. प्रांताध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव अँड महेश दादा गणगणे,अकोला जिल्हा अध्यक्ष अशोकजी अमानकर,तेल्हारा तालुक्का अध्यक्ष श्री.गजानन वानखडे, व वरिष्ठ पदाधिकारी यांचे आभार मानले असून, सोपवलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडण्याचा मानस व्यक्त केला आहे