
तेल्हारा प्रतिनिधी :-
विदर्भाची पंढरी समजल्या जाणारी शेगाव नगरी मध्ये असलेल्या भुसावळ मंडळात येणारे शेगाव रेल्वे स्टेशन आणि या शेगाव रेल्वे स्टेशन वर आज शुक्रवार दि. 15/5/2026 ला विश्व पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला शेगाव रेल्वे स्टेशन चे अधिकारी व कर्मचारी आणि रेल्वे प्रवासी मोठ्या संख्येने हजर होते या ठिकाणी सर्वांनी हात पुढे करुन संकल्प केला या दरम्यान 15/5/2026 ते 5/6/2026 पर्यंत विश्व पर्यावरण दिना पासून विस दिवस वेगवेगळे उपक्रम राबविण्याचा संदेश देवून या मध्ये प्लास्टिक बंदी झाडे लाव झाडे जगवा आज काळाची गरज असलेल्या विषयाचे मुद्द्यावर वाचन केले यावेळी शेगाव रेल्वे स्टेशनचे अधिकारी एस.एम. चव्हाण सर. एच. आय. लाभिणीताई पाटील. सी.टी.आय.एम.आर.खान.ओ.एस.सुनिलजी चांभारे.ओ.एस.यास्मिन नाज. ओ.एस.विनोदभाऊ इंगळे .ओ.ए.भिकाजी भाऊ बनकर. आणि रेल्वे स्टेशनवर असलेल्या साई एजन्सी चे कर्मचारी व रेल्वे प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते