
तेल्हारा प्रतिनिधी :-
तेल्हारा येथील पंचायत समिती कार्यालयात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (शिवजयंती) अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे दहिगाव येथील शिवसेनेचे पहिले शाखाप्रमुख ज्येष्ठ शिवसैनिक गणेशराव इंगोले यांच्या हस्ते छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
महाराष्ट्रा चे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून तेल्हारा पंचायत समितीमध्ये शिवजयंती चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जेष्ठ शिवसैनिक गणेशराव इंगोले यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
या प्रसंगी रवी काळोने वरिष्ठ सहा, राजू मोहोड वरिष्ठ सहा, कैलास पांडे कनिष्ठ सहा, दीपक साबळे सेवा निवृत्त कनिष्ट अभियंता, सुशील राठोड कनिष्ठ सहा, आशिष ढोले कनिष्ठ सहा, प्रशांत दोडेवार, भोयर, सागर सारवाण, गजानन फसाले, निलेश नायकवाडे, पत्रकार संघाचे पश्चिम विदर्भ अध्यक्ष पुरुषोत्तम इंगोले सह पंचायत समितीचे विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी आणि तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते. दहिगावचे पहिले शाखाप्रमुख म्हणून गणेशराव इंगोले यांनी संघटनेसाठी दिलेले योगदान आणि त्यांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता, त्यांच्या हस्ते हे पूजन होणे हा शिवसैनिकांसाठी सन्मानाचा क्षण मानला जात आहे.
गणेशराव इंगोले यांचे मनोगत
पूजन केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना गणेशराव इंगोले म्हणाले की,
”छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार केवळ भाषणात न ठेवता ते प्रत्यक्ष आचरणात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. शिवरायांच्या स्वराज्यात सामान्य माणूस केंद्रस्थानी होता, तोच वारसा आपण सर्वांनी पुढे चालवला पाहिजे.”
कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे दहिगावचे पहिले शाखा प्रमुख गणेशराव इंगोले यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला ऐतिहासिक संदर्भ लाभला.
तसेच पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिस्तबद्ध पद्धतीने सोहळा पार पाडला.