
अकोट ता
प्रतिनिधी :-रामेश्वर कावरे
अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनचे कर्मचारी पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त माहिती मिळाल्यावरून रेड केली असता.(१) पोपटखेड शेतशिवारात गावठी दारू गाळणा-या इसमावर सडवा मोहामाच व हातभट्टीची दारू किंमत ६०,७७० / रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.(२)ग्राम कुंड येथील अवैधरित्या देशी दारू विकणा-या इसमाकडुन १०,२००/रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (३) ग्राम आसेगाव बाजार येथील अवैधरित्या देशी दारू विकणा-या इसमाकडुन ३,२००/ रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.(४) ग्राम रंभापूर येथील अवैधरित्या देशी दारू विकणा-या इसमाकडुन २,२००/ रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. व (५) ग्राम मुंडगाव येथील अवैधरित्या देशी दारू विकणा-या इसमाकडुन ५,७००/-रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.असा एकुण ८२,०७०/- रू चा मुद्देमाल जप्त करून आरोपीतांचे विरुध्द महा.दारूबंदी अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई मा.जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचे आदेशान्वये मा.अपर पोलीस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी,मा.सहा.पोलीस अधीक्षक निखील पाटील यांचे मार्गदर्शनाखाली अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे सहा.पोउपनि वासुदेव ठोसरे,पोहेको सागर नागे,हरिष सोनवणे,राजेश्वर सोनुने,विठ्ठल चव्हण,सुधीर झटाले,शिवाजी सोळंके,शिवकुमार तोमर,उमेशचंद्र सोळंके,मोहम्मद नौरंगाबादी,मपोहेकॉ उषा सिरसाट,पोकों गोपाल जाधव,रवि आठवले,राजेश माळेकर यांनी केली