
गणेशराव उमाळे प्रतिनिधी
भांबेर भांबेरी येथील शेतकऱ्यांचे पावसाळ्यात होणारे हाल पाहता विकास महर्षी आमदार भारसागर साहेब यांनी मोठ्या मुश्किलीने पाठपुरावा करून येथील शेतकऱ्यांना आपल्या शेतीत जाण्याकरिता शेत रस्ता म्हणजेच पानद रस्ता मंजूरात केला व त्या रस्त्याचे काम जोमाने सुरू झाले परंतु काही दिवसापासून ते काम बंद पडलेले दिसते पावसाळा तोंडासी आलेला आहे हे काम केव्हा होणार याची गावकऱ्यांना प्रश्न पडला आहे कारण की आमदार साहेबांनी एवढे प्रयत्न करूनही ठेकेदार महाशय काय करून राहिले याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कारण की हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून शेतात जाण्याकरिता मेन रस्ता आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांची वाहतूक ह्याच रस्त्याने होते तो रस्ता होणे जरुरीचे आहे तरी आमदार साहेबांनी याकडे लक्ष देऊन संबंधित ठेकेदारांना ताकीद द्यावी जेणेकरून पावसाळ्याच्या अगोदर हा पानद रस्ता पूर्ण होईल ह्या रस्त्याच्या मधोमध एक रफट्या काम राहिलेले आहे त्याकरिता कोणतीच प्रतिक्रिया दिसत नाही त्यामुळे या ठिकाणी रपट्टा होते की नाही याविषयी शेतकऱ्यांमध्ये शंका येत आहे हा रस्ता त्वरित व्हावा याकरिता सर्व शेतकऱ्यांची एकच मागणी आहे पावसाळ्याच्या अगोदर हा रस्ता पूर्ण व्हावा अशी मागणी होत आहे