
सतोष विणके:-अकोट प्रतिनिधी
अकोट:-
स्थानिक श्रीजी कॉलनी स्थित सेंट पॉल्स अकॅडमी अकोट येथे मातृ- पितृ पूजन दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून नवनीत लखोटीया व लुणकरन डागा , प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद चांडक, मुख्याध्यापक विजय बिहाडे उपमुख्या ध्यापिका ममता श्रावगी , रिंकू अग्रवाल तसेच पर्यवेक्षक अभिजीत मेंढे, मालती महाले,सारिका रेळे, वैशाली गावत्रे यांची मंचावर उपस्थिती लाभली. मातृ पितृ पूजन दिवस हा कार्यक्रम श्री योग वेदांत सेवा समिती अकोट कडून घेण्यात आला. तसेच या समितीचे सदस्य सतीश गुप्ता, राकेश मनवाणी, जीवन पाटील, गजानन मोहोळ, माधुरी नाथे, भारती भुस्कट यांची उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाचे संचलन मनीषा रोहनकर व भरत तेवाणी यांनी केले .
मातृ पितृ पूजन दिना निमित्य आई-वडिलांचे महत्त्व देवेंद्र बोडखे यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
व आई वडिलांची पूजा कशी करावी भरत तेवाणी यांनी सांगितले.व मातृ पितृ पूजन दिवसाचे महत्व सांगितले. यशस्वी कार्यक्रमाच्या बद्दल पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन माधुरी मानकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दिक्षिता चोपडे ,आनंद काळमेघ , सुदर्शन अंभोरे, शुभम कळसकर, वैभव हिंगणकर, नारायण वानखडे व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले .