
राजकुमार चिंचोळकर :- बाळापुर तालुका प्रतिनिधी
बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील घराला आग लागून घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना दिनांक १३ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वाडेगाव येथील जुन्या ग्रामपंचायत इमारत जवळच भाड्याने खोली मजूर महीला सिंधू रमेश आकोटकर राहत आहे. दरम्यान सकाळी आठ वाजताच्या सुमारास काही कामानिमित्त सदर महिला बाहेर गेल्या असता परत येताच घरातून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे आले . त्यामुळे महीलेनी आरडाओरडा केला असता परिसरातील नागरिक धावून येवून दरवाजा उघडून पाहिले त्यावेळी घरातील जवळपास सर्वच संसार उपयोगी साहित्य लागलेल्या आगीत भस्मसात झाले असल्याचे उपस्थित नागरिकांच्या निदर्शनास आले. घरात घुसमटत असलेली आग नागरिकांनी अथक परिश्रम घेवून विझविली तोपर्यंत घरात काहीच शिल्लक राहिले नाही. लागलेल्या आगीत घरातील संसार उपयोगी साहित्य तसेच नगदी जवळपास पंचवीस ते तीस हजार रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घराला आग कशामुळे लागली याबाबत कुठलीच माहिती हाती आली नसून लागलेल्या आगीत घरातील सिलिंडर चा सुदैवाने स्फोट झाला झाली अन्यथा मोठी दुर्घटना झाली असती असे त्यावेळी उपस्थित नागरिक बोलत होते.