
सेवा निवृत्त कर्म अकोट प्रतिनिधी :-संतोष विणके
अकोट- सेवा निवृत्त कर्मचारी वर्गाने संघटने साठी वेळ दिला पाहिजे, तसेच सक्रिय राहिले पाहिजे. थांबला तो संपला हे तत्व लक्षात ठेवून सतत चांगल्या व रचनात्मक कार्यात सक्रिय सहभागी झाले पाहिजे, असा हितोपदेश अकोट तालुका सेवानिवृत्त कर्मचारी मंडळाच्या आमसभेत मान्यवरांनी केला.
कर्मचारी मंडळाचे अध्यक्ष सुखदेव मसने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हा सेवानिवृत्त मंडळाचे अध्यक्ष सत्यनारायण बाहेती, उपाध्यक्ष रामभाऊ बिरकड, सचिव एकनाथ उके, अकोट पदाधिकारी जयकृष्ण वाकोडे, टी व्ही सावरकर, का ज दाते सभामंचावर हजर होते.
सेवानिवृत्त कर्मचारी हा अनुभव संपन्न असतो, त्याने आपला अनुभव सामाजिक कार्यात उपयोगी आणावा. निवृत्त कर्मचाऱ्याने स्वतः ला कोषात कोंडून न घेता समाजाभिमुख व्हावे, स्वतःच्या हक्कासाठी व एक जागरूक नागरिक म्हणून कर्तव्यासाठी सुध्दा जागरूक राहावे असे आवाहन मान्यवर वक्त्यांनी केले
या प्रसंगी दिवंगत कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, वयाची पंचाहत्तरी पूर्ण करणाऱ्या कर्मचारी वर्गाचा सत्कार करण्यात आला तसेच नवीन सभासदांचे स्वागत करण्यात आले
कार्यक्रम चे संचलन सचिव गजानन राठोड यांनी तर आभारप्रदर्शन फुलारी यांनी केले
आमसभेला तालुक्यातील सर्व सभासद हजर होते