
अंजनगाव सुर्जी प्रतिनिधी-अनंता मते
अमरावती-अंजनगाव सुर्जी तालुक्यातील विहिगाव शिवारात बुधवारी रात्री एका 35 वर्षीय आदिवासी मजूर महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून या थरारामुळे संपूर्ण जिल्हा हादरला असून पिंकी ईडापाचे वय 35 राहणार जुनापाणी जिल्हा बैतूल मध्य प्रदेश या दुर्दैवी महिलेचे नाव असून ती आपल्या कुटुंबासह कपाशी वेचणी आणि हरभरा कापणीच्या हंगामा करिता या परिसरात मजुरीसाठी आली होती. ज्या शेतात ती पोटाची खडगी भरण्यासाठी दिवसभर राबत होती त्याच शेतात तिचा संशयास्पद अंत झाला. विहीगाव येथील शेतकरी रामकृष्ण धनोकार यांच्या शेतात हा मृतदेह आढळून आला असून घटनेची माहिती मिळताच गावचे पोलीस पाटील राहुल बोरडे यांनी तातडीने रहिमापूर पोलिसांना प्राचार्य केले. घटनेचे गांभीर्य आणि परिसरातील वाढता तनाव लक्षात घेता ठाणेदार अनंत वडतकर उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन सोनवणे यांनी तातडीने घटनास्थळ गाठुन तपासाची चक्रे फिरवली मृत्यूचे नेमके कारण प्रथमदर्शनी स्पष्ट होत नसल्याने अचलपूर येथील फॉरेन्सिक तज्ञांनी घटनास्थळाची सूक्ष्म पाहणी करून मातीचे नमुने आणि इतर तांत्रिक पुरावे जमा केले आहे. सध्या कपाशीचा हंगाम जोरात असल्याने मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील शेकडो मजूर येथे वास्तव्यास आहेत. अशातच ही घटना घडल्याने मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रानडुकरांचा उपद्रव रोखण्यासाठी शेतात बेकायदेशीरपणे लावलेल्या झटका मशीन मधील तीव्र विद्युत प्रवाहाचा धक्का बसून हा मृत्यू झाला असावा अशी दाट शक्यता परिसरातील गावकऱ्यांकडून वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे संबंधित महिला गेल्या काही दिवसापासून अति मध्य प्राशनाच्या आहारी गेली होती अशीही चर्चा स्थानिक स्तरावर रंगत आहे पिंकी ही विधवा असून तिच्या पश्चात दोन लहान मुली आहे त्यांचे छत्र आता कायमचे हरपले आहे पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी अंजनगाव ग्रामीण रुग्णालया त पाठविला असून जोपर्यंत वैद्यकीय अहवाल येत नाही तोपर्यंत मृत्यूचे ठोस कारण सांगणे कठीण आहे. असे ठाणेदार अनंत वडतकर यांनी स्पष्ट केले पोलिस आता या प्रकरणाचा सर्व बाजूंनी कसून तपास करत असून हा निवड अपघात आहे की यामागे काही दडल आहे .