
अकोट प्रतिनिधी :-सतोष विणके
श्रद्धा सागर क्षेत्री वासुदेव भक्तांची मांदियाळी
अकोट.श्रद्धासागर.
वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू संतश्रेष्ठ श्री वासुदेव महाराजांचे जीवन पवित्र आहे.त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य चंदना सारखं झिजविलं ३४ ज्ञानग्रंथ विरचित करून समाजाला सत्याचा सन्मार्ग दाखविला.गुरुवर्य हे अकोट संत नगरीचे आध्यात्मिक वैभव आहेत. गुरु श्रींचा जयंती महोत्सव म्हणजे श्रद्धा भक्ती ज्ञानाचा अपूर्व संगम आहे अशा आशयाचे भावपुर्ण प्रतिपादन आकोटच्या नगराध्यक्षा सौ.मायाताई धुळे यांनी केले.
श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेअंतर्गत आयोजित श्रीक्षेत्र श्रद्धासागर येथे शुक्रवारी श्री संत वासुदेव महाराज यांच्या १०९व्या जयंती महोत्सवाच्या शुभारंभ झाला . या प्रसंगी बोलताना नगराध्यक्ष मायाताई धुळे बोलत होत्या.याप्रसंगी श्री भागवताचार्य ह.भ.प.प्रल्हाद महाराज भांडे व श्रीहरी महाराज सोनेकर,
संस्थाध्यक्ष ह भ प श्री वासुदेवराव महल्ले उपाध्यक्ष बाबाराव बिहाडे व महादेवराव ठाकरे व कोषाध्यक्ष पुरुषोत्तम लाजुरकर ,सचिव रवींद्र वानखडे सहसचिव अवी गावंडे, सुनंदाताई आमले जयदीप सोनखासकर ,अशोकराव पातळी नंदकिशोर हिंगणकर ॲड. शिरीष ढवळे दिलीपराव हरणे अनिल कोरपे, जयकृष्ण वाकोडे, मधुकरराव पुंडकर बाळासाहेब आमले,सुरेंद्र चिकटे,आदी मान्यवर उपस्थित होते
याप्रसंगी भागवत ध्वज पुजन, गुरु पुजन व गुरु वंदना नगराध्यक्ष माया ताईंनी केले
नगराध्यक्षा सौ मायाताई धुळे यांचा संस्थाध्यक्ष वासुदेवराव महल्ले यांचे हस्ते शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून यथोचित सत्कार करण्यात आला.गुरुवर्याचा आशीर्वाद माझे पाठीशी आहे.आकोट शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी मला तेच बळ देतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तद्नंतर ह.भ.प. सुभाष महाराज बानेरकर यांचे सुश्राव्य प्रवचन पार पडले
दरम्यान पहाटे सकाळी श्रींचा अभिषेक तथा तीर्थ स्थापना व ग्रंथ पुजन संस्थेचे सचिव रवींद्र वानखडे यांचे शुभ हस्ते सपत्नीक पार पडले. श्री ज्ञानेश्वरी पारायणाला पहिल्या दिवशी भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पारायण पिठाचे नेतृत्व ह. भ.प. अंबादास महाराज व अनंत महाराज आवारे यांनी केले.
श्री क्षेत्र श्रद्धासागर जयंती महोत्सवात सहभागी झालेल्या वासुदेव भक्तांनी फुलून गेले आहे.भव्य मंडप,संतपीठावरील गुरुवर्याचा रजत मुर्ती, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वै.पंजाबराव हिंगणकर महाद्वार,वारकरी पताका,गुरु मंदिर व परिसराचे आकर्षक सुशोभीकरणाने या पुण्यभूमीत नवचैतन्य निर्माण झाले आहे. गावोगावचे सेवेकरी भाविकांचे सेवेत योगदान देत आहेत.