
तेल्हारा प्रतिनिधी :-
तेल्हारा :- तेल्हारा नगरपरिषद मध्ये नव्याने हद्दीत समाविष्ट झालेल्या प्रभाग क्रमांक १ मध्ये येत असलेल्या पाढरी येथील बुद्ध विहाराचे सौंदरींकरण १४ एप्रिलच्या आत करण्याबाबत नगरसेविका तथा गटनेत्या कान्होपात्रा रामभाऊ फाटकर यांनी दि.१२ फेब्रुवारीला पालिका अध्यक्षा व मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.
नव्याने हद्दीत समाविष्ट झालेल्या प्रभाग क्रमांक १ मधील पाढरी या भागामध्ये बुद्ध विहाराचे काम अर्धवट झालेले असून सदर बुद्ध विहाराच्या सौंदरीं करनाची नितांत आवश्यकता आहे त्यामुळे भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पूर्वी, १४ एप्रिलच्या आत तेथील सौंदरीकरणाचे काम करण्यात यावे या बुद्ध विहारामध्ये भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचे पुतळे आहेत यापूर्वीसुद्धा सदर बुद्धविहाराच्या सौंदरींकरण्याचे काम करण्यात यावे या महत्त्वपूर्ण विषयाबाबत मागणी करण्यात आली होती परंतु मागणीनुसार बुद्ध विहाराच्या सौंदरीकरणाचे काम झाले नाही याबाबत कुठलेही नियोजन बांधकाम विभागाने केले नसल्याचे दिसून येत आहे तरी १४ एप्रिल ,२०२६ च्या आत सदरचे काम विना विलंब कसे मार्गी लागेल यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी निवेदनाद्वारे नगरसेविका कान्होपात्रा फाटकर यांनी पालिका अध्यक्षा, मुख्याधिकारी व सभापती,
बांधकाम समिती
न.प.तेल्हारा यांच्याकडे केली आहे.