
तेल्हारा प्रतिनिधी:-
तेल्हारा : तेल्हारा तालुक्यातील ग्राम पाथर्डी येथील रोशन गजानन ईगळे शेतकऱ्याची गीर
जातीची गाय व गोन्हा किंमत अंदाजे गाय30हजार रुपये गोरा 20हजार अज्ञात आरोपीने ९ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ ते ३.३० वाजे दरम्यान चोरून नेल्याप्रकरणी तेल्हारा पोलिस स्टेशनमध्ये गुरुवार, १२ फेब्रुवारी रोजी तक्रार नोंदविण्यात आली आहे. फिर्यादी शेतकरी गजानन भिकाजी इंगळे (५७) रा. पाथर्डी यांच्या मालकीची एक गीर जातीची तसेच एक गोन्हा सोमवार, ९ फेब्रुवारीच्या दुपारी १२ तेसाडेतीन वाजेदरम्यान अज्ञात इसमाने चोरून नेल्याप्रकरणी तेल्हारा पोलिस स्टेशनमध्ये फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तेल्हारा पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक प्रकाश तुनकलवार यांच्या मार्गदर्शनाखाली तेल्हारा पोलीस तपास करीत आहेत.
शेतकरी मोबाईल न. 9604504698