
तालुका प्रतिनिधी अंजनगाव सुर्जी अनंत मते
अंजनगाव सुर्जी-तालुक्यात वाढत्या अवैध रेती तस्करी विरोधात महसूल विभागाने आज दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे धाडसी कारवाई करत मोठा प्रकार उघडकीस आणला. परतवाडा मार्गावरून अंजनगावकडे येणारा रेतीने भरलेला डंपर पकडण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन न थांबवता भरदाव वेगात पळ काढला भरारी पथकाने तात्काळ पाठलाग सुरू केला मात्र चालकाने चालत्या वाहनातून मागील फाटक उघडून अंदाजे आठ ते दहा ब्रास रेती रस्त्यावर सांडत अकोट रोडने पलायन केले या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले .
थरारक पाठलाग ,
महसूल अधिकाऱ्यांना धक्काबुक्की
ग्राम महसूल अधिकारी योगेश सुधाकर लंगडे विहीगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सकाळी सुमारे 5.30 वाजता उत्सव नाक्याजवळ भरारी पथक तैनात असताना संशयीत डंपर आढळला वाहन थांबवण्याचा इशारा देऊनही चालकाने दुर्लक्ष केले .गोमाता दूध डेरी परिसरात ट्रक थांबून रेती वाहतुकीचा पास मागितला असता चालकाकडे कोणतीही वैद्य परवानगी आढळली नाही वाहन तहसील कार्यालयात लावण्यास सांगितल्यावर चालकाने महसूल अधिकारी लंगडे यांना धक्काबुक्की करून वाहन पळून नेले या प्रकारामुळे मागील वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झाला होता ट्रकसोबत स्विफ्ट कार मालकाची नावे समोर घटने दरम्यान ट्रक सोबत एम एच 27 डी ई 57 85 क्रमांकाची स्विफ्ट कार असल्याचे समोर आले संबंधित कारचा चालक अविनाश जाधव असल्याची माहिती मिळाली आहे ट्रक व कारचे मालक प्रज्वल माथनकर व यश राजगुरू राहणार मोर्शी असल्याचे तक्रारीत नमूद आहे़़ त्याचा नंबर प्लेटवर तेल लावल्या असल्यामुळे क्रमांक पष्ट पणे नोंदवता आल्या नसल्याने अधिकाऱ्यांनी सांगितले .
शहानूर पुलापासूनतहसीलदार निवासापर्यंत रेतीचा सडा पाठलागा दरम्यान चालकांनी मोठ्या प्रमाणात रेती सांडल्यामुळे शहानूर पुलापासून तहसीलदाराच्या निवासस्थानापर्यंत संपूर्ण रस्त्यावर रेतीचा थर पसरला होता परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन त्यांच्या सक्षम पंचनामा करण्यात आला जेसीबीच्या साह्याने सांडलेली रेती गोळा करून ती तहसीलदारांच्या तोंडी आदेशानुसार निवासस्थानासमोर ठेवण्यात आली.
पंचनामा पूर्ण पोलिसात लेखी तक्रार
महसूल अधिकारी लंगडे व काटकर यांच्या उपस्थितीत पंच निलेश भोंडे श्रीकृष्ण सुने जीवन चराटे मोहन वडे व रामदास कोरे यांच्या साक्षीने पंचनामा पार पडला यानंतर अंजनगाव पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित ट्रकचालक व मालकावर कठोर कारवाई करण्यात आली आहे नागरिकांमध्ये अवैध रेती तस्करीमुळे शासनाचा महसूल बुडत असून सार्वजनिक रस्त्याची हानी व धोका वाढत आहे दिवसाढवळ्या घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्रसंताप व्यक्त होत आहे .आता संबंधित प्रकरणाचा शोध घेऊन प्रशासन कोणती ठोस कारवाई करते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे