
तेल्हारा/प्रतिनिधी:- प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय तेल्हारा द्वारा आयोजित सफलता के सात कदम या विषयावरील सात दिवशीय प्रवचन मालेचा समारोप बुधवार दि. 11 फेब्रुवारी रोजी यशस्वीरित्या संपन्न झाला. प्रवचन मालेच्या सातही दिवस तेल्हारा वाशीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रवचन माला यशस्वी केली. छत्तीसगड राज्यातील बिलासपूर येथील सुप्रसिद्ध प्रवचनकार ब्रह्माकुमारी राखी दीदी यांच्या प्रवचना चा कार्यक्रम 5 फेब्रुवारी ते 11फेब्रुवारी दरम्यान ब्रह्म कुमारी सेवा केंद्र तेल्हारा येथे संचालिका ब्रह्मा कुमारी प्रमिला दीदी यांच्या मार्गदर्शना खाली आयोजित करण्यात आला होता.5 फेब्रुवारीला अकोला वाशीम ब्रह्माकुमारीज प्रमुख ब्रह्मा कुमारी रुख्मिणी दीदीजी यांच्या अध्यक्षतेखाली आमदार प्रकाश भारसाखळे यांच्या हस्ते उदघाट्न करण्यात आले होते. सफलता के साथ कदम या प्रवचनेमधून आजच्या धावपळीच्या व ताणतणावाच्या काळात तणावमुक्त जीवन जगण्यासाठी अध्यात्मिक ज्ञानाची आवश्यकता आहे.आध्यत्मिक ज्ञान सकारात्मक विचारांची चाबी आहे परंतु त्याचा यथार्थ परिचय किंवा अभ्यास करण्याची कला आत्मसात करण्याची आवश्यकता आहे. राखी दीदींनी सात दिवस उपस्थित असलेल्या बालकांपासून तर वृंद्धापर्यंत सर्वाना उपयुक्त ज्ञान अतिशय सहज सोप्या पद्धतीने हसत खेळत सर्वाना सहभागी करून घेतले. कृतियुक्त प्रवचनामुळे अबालवृद्धीनी आनंदाने प्रतिसाद दिला.राखी दिदी ची मधुर वाणी, प्रेमळ भाषा व प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित दिलेले दृष्टांत आणि दाखले यामुळे सर्वांनी एकरस होऊन ज्ञान श्रवण केले. सात दिवसात प्रत्येकाला आनंदी जीवन व्यतीत करण्याचे कौशल्य प्राप्त झाल्याचे समाधान मिळाले.सात दिवस प्रवचन मालेच्या यशस्वीतेसाठी ब्रह्माकुमारी ज्योती दिदी रिसोड,सुष्मादिदी खामगाव, गीता दिदी रिसोड, वैष्णवी दिदी तेल्हारा, श्यामभाई, विशालभाई अकोला यांच्यासह ब्रह्माकुमारीज परिवार तेल्हारा च्या ज्ञानार्थी भाऊ बहिणीचे महत्वपूर्ण सहकार्य मिळाले. तेल्हारा सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी प्रमिला दीदींनी प्रवचनकार राखी दीदींचा सन्मान सत्कार करीत त्यांनी केलेल्या ज्ञानदानाबद्दल त्यांचे विशेष आभार व्यक्त केले. तर सात दिवस उपस्थित राहिलेल्या श्रोतागण व कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्याना मनःपूर्वक धन्यवाद दिले.