
अकोट प्रतिनिधी :-संतोष विणके
शहरात न्यू सुर संगम कराओके ग्रुपच्या वतीने अकोला मार्गावरील सुर्या लॉन येथे भारतरत्न, स्वरकोकिळा लता मंगेशकर यांना स्वर आदरांजली अर्पण करण्यासाठी मेरा दिल ये पुकारे.या भव्य संगीत कार्यक्रमाचे आयोजन दि.१० फेब्रु ला करण्यात आले होते.कार्यक्रमात लता दीदींच्या अजरामर गीतांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय व भावनाप्रधान झाले होते.हा कार्यक्रम न्यु सुरसंगम गृपचे अध्यक्ष सुधिर ढाकरे सचिव बंटी उर्फ दिनेश मर्दाने,अनिल बाभूळकर यांच्या पुढाकारातुन झाला. सौ युगेश्वरी हरणे अकोला यांनी या कार्यक्रमातील युगल गितांना स्वर साथ दिली.संचालन प्रकाश गायकी यांनी केले. विविध गायक-गायिकांनी लता मंगेशकर यांच्या लोकप्रिय गीतांचे सादरीकरण करून उपस्थित रसिकांची मने जिंकली. प्रत्येक गीतातून लता दीदींच्या स्वरातील माधुर्य व त्यांच्या संगीतसेवेचे स्मरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला संगीतप्रेमींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली. उपस्थितांनी न्यू सुर संगम कराओके ग्रुपच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.