
प्रभुदास पारस्कार:- संग्रामपुर तालुका प्रतिनिधी :-
संग्रामपूर तालुक्यातील तामगाव व सोनाळा पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध गोवंश तस्करी, कत्तल व गोमांस विक्रीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचा स्पष्ट आरोप करत ॲड अमोल अंधारे यांच्या उपस्थितीत तालुक्यातील विश्व हिंदू परिषद व बजरंग दल व सकल हिंदू समाज यांच्या वतीने तहसील कार्यालय संग्रामपूर , ठाणेदार पोलीस स्टेशन तामगाव तथा ठाणेदार पोलीस स्टेशन सोनाळा तथा तालुक्यातील 70 ग्रामपंचायत ग्रामसेवक व विविध कार्यालयांना निवेदन देऊन संबंधीत गुन्हेगारांवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदनात नमूद करण्यात आले की, संग्रामपूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या गौवंश तस्करी, गौवंश हत्या व गौमांस विक्री सुरू असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. तामगाव व सोनाळा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या संग्रामपूर आदी गावांमध्ये अवैधरीत्या गौवंश कत्तल केल्या जात असून, मोटरसायकल व इतर वाहनांद्वारे बेकायदेशीररित्या वाहतुक करत आजूबाजूच्या गावांमध्ये खुलेआम विक्री केली जात आहे. यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उमटत असून संबंधीत गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणीही होत आहे . ही बाब महाराष्ट्र पशुसंवर्धन (गौवंश संरक्षण) अधिनियम, 2015 तसेच भारतीय दंड संहितेअंतर्गत गंभीर व दखलपात्र गुन्हा असताना देखील, परिणामी समाजकंटक निर्भयपणे बेकायदेशीर धंदे सुरू ठेवत असून, कायदा व सुव्यवस्थेला थेट आव्हान देत आहेत. संबंधितावर कठोर कारवाई करत अवैद्य कत्तलखाने बंद करावेत,मास वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली वाहने जप्त करावीत , विश्व हिंदू परिषद , बजरंग दल संघटना कार्यकर्त्यांवर हल्ला व धमकी देणाऱ्या आरोपीना तात्काळ अटक करा तसेच पोलीस, महसूल व पशुसंवर्धन विभाग यांची संयुक्त विशेष पथके स्थापन करून नियमित छापे टाकून त्यांच्या वेळीच मुसक्या आवळून प्रशासनाने या गंभीर विषयाकडे तात्काळ लक्ष न दिल्यास तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील, असा स्पष्ट इशारा देत योग्य ती कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सदर निवेदनाद्वारे करण्यात आली असून यावेळी ॲड अमोल अंधारे ,भारत बावस्कार ,भीमाशंकर कातव,अविनाश भोपळे विश्व हिंदू परिषद ,बजरंग दल पदाधिकारी तथा असंख्य कार्यकर्ते तथा सकल हिंदू समाज बांधव नागरिक उपस्थित होते .