
.
तेल्हारा प्रतिनिधी :-
श्री ज्ञान भास्कर सेवा संस्थान हिंगणी खुर्द द्वारा संचालित श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे गत १० वर्षा पासून याहीवर्षी दि. १३ ते २० .२.२०२६ या कालखंडात संत श्री वासुदेवजी महाराज अवतिर्णोत्सव तथा मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनाचे औचित्य साधून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामूहिक पारायण तसेच संतश्रेष्ठ आदिशक्ती मुक्ताईंच्या ” ताटी उघडा ज्ञानेश्वरा” या मालिका प्रकरणातील अभंगांवर ज्ञानयज्ञ प्रवचन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
उपरोक्त कार्यक्रमात दररोज पहाटे ५ ते ६ काकडा भजन ७ ते ८ विष्णुसहस्त्रनाम तथा गोपी गीत व भ्रमर गीत पठण. ९ ते १२ ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामूहिक पारायण. १२ ते १ गाथा भजन. दुपारी ३ ते ५ या वेळेत भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ यांचे चिंतनीय ” ताटी उघडा ज्ञानेश्वरा ” या विषयावरील प्रवचन ५ ते ६ वारकरी संध्या हरिपाठ लगेच सात ते नऊ या वेळेत श्री ज्ञानेश आश्रमाच्या आजी माजी नामवंत विद्यार्थ्यांची अभ्यासपूर्ण कीर्तने होतील . तरी पंचक्रोशीतील भाविक सद्भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाकरिता तन-मन-धनाने सहकार्य करावे असे आवाहन संपूर्ण विश्वस्त मंडळाने केल्याचे श्रीयुत ज्ञानेश्वर महाराज भालतिलक हे कळवितात.