
तेल्हारा प्रतिनिधी :-
तेल्हारा :- तेल्हारा नगरपरिषद मध्ये इतर प्रभागांच्या तुलनेत प्रभाग क्रमांक १ मध्ये अनेक समस्या असून नागरिकांच्या मागणीनुसार अनेक विकास कामांना गती देणे गरजेचे असल्यामुळे प्रभाग क्रमांक एक च्या नगरसेविका पालिका गटनेत्या कान्होपात्रा रामभाऊ फाटकर यांनी विकास महर्षी आमदार प्रकाश भारसाकळे यांच्याकडे आपल्या निधीतून विविध विकास कामे मार्गी लावण्या संदर्भात निवेदन दिले आहे.
तेल्हारा पालिकेमधील सर्वात मोठे क्षेत्रफळ व सर्वाधिक समस्या असलेल्या प्रभाग क्रमांक एक मधील विकास कामे मार्गी लावणे गरजेचे आहे त्या मध्ये नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविणे याला प्राधान्य देऊन
नागरिकांच्या मागणीनुसार जनहितार्थ धर्मवीर संभाजी चौकामध्ये बजरंग बलीच्या मंदिरासमोर सभामंडप ,सुपीनाथ नगरामध्ये मारुतीरायांच्या मंदिरासमोर सभामंडप, संत गाडगेबाबा सभागृहासमोर व्यायाम शाळा ,टाकोणकार समाज बांधवांचे आराध्य दैवत वळेखन माऊलीच्या मंदिरासमोर सभागृह बांधण्यात यावे तसेच पांढरी या भागाचा सर्वांगीण विकास करणे याबाबत प्रभाग एकच्या नगरसेविका कान्होपात्रा रामभाऊ फाटकर यांनी आ.प्रकाश भारसाकळे यांच्याकडे निवेदन देऊन सदर विकास कामे आपल्या निधीमधून मंजूर करण्यात यावे अशी मागणी केली असता आ. प्रकाश भारसाकळे यांनी मागणीनुसार विकास कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले या वेळी नगरसेविका रिनाताई मुकेश आसरे तेल्हारा विकास मंचचे अध्यक्ष रामभाऊ फाटकर मुकेश आसरे आदी उपस्थित होते.