
संतोष विणके:- प्रतिनिधी अकोट – अकोट तालुक्यातील शिवपुर येथे नुकतेच भव्य रक्तदान शिबीर संपन्न झाले.
स्व.बाळकृष्ण जानरावजी महाले यांच्या तेरवीचे नीमीत्त पारंपरिक रुढी परंपरेला थारा न देता,एक आदर्श घालत तेरवीचे दिवसी शिवपुर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन महाले परीवाराचे वतीने करण्यात आले.यावेळी ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले..या शिबीरात संघर्ष ब्लड गृप महा.राज्य व मेळघाट ब्लड बँक परतवाडा येथील डॉ व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ संजयजी महाले , सरपंच मायाताई महाले यांचेसह गावातील मंडळींची उपस्थीती लाभली