
संतोष विणके :- अकोट प्रतिनिधी आकोटःशहरातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये संगीताची आवड निर्माण होऊन अकोट शहर संगीतमय व्हावे, हा दृष्टिकोन समोर ठेवून संगीतमय अकोट समूह स्थापन करण्यात आला .त्याचाच एक भाग म्हणून अकॅडमी ,सरस्वती नगर ,अकोट येथे शहरातील वर्ग 3 ते 9 च्या विद्यार्थ्यांसाठी आंतर शालेय गीत गायन या आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर अकोला येथील संगीत तज्ञ ,सतीश खोडवे ,दुसरे संगीत तज्ञ माधव जोशी ,प्राचार्य विजय बिहाळे ,उद्योजक अमित संघानी हे सदस्य प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे रंगबहार संचालन शिरीष वंजारा यांनी आभार प्रदर्शन प्रा.अरूण हिंगणकर यांनी केले .या कार्यक्रमामध्ये एकूण 54 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यामधील अ गटातील प्रथम विजेत्या कु. स्वानंदी सचिन काकड ,द्वितीय विजेत्या श्रीमयी धर्मपाल चिंचोलकर तर तृतीय क्रमांक कु.रुचिता राहुल गवई आणि प्रोत्साहन पर बक्षीस कु. प्राची विशाल चंडालीया ,कु ईशिता भास्कर थुटे ,नित्या राजेश झांमरे यांना मिळाले तर ब गटातील प्रथम क्रमांक कु. दिव्यांनी सुजित यवतकर ,द्वितीय क्रमांक कु.आनंदी सचिन काकड यांना मिळाला .तर तृतीय क्रमांक वीरा प्रशांत खोडके यांना मिळाला.तर ब गटातील प्रोत्साहन पर बक्षीस बक्षीस कु. निधी विवेक कोल्हे, कु.ज्ञानाई प्रवीण कुलट, कु. पूर्वा राहुल धांडे यांना मिळाले. तशेच सेंटपॉल पब्लिक स्कूल आणि स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल या शाळांमधून प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल संगीतमय अकोट समूहातर्फे शाळांना ट्रॉफी प्रदान करून व्यासपीठावर गौरव करण्यात आला. अकोट शहरांमधील बरेच वर्षानंतर संपन्न झालेल्या या शिस्तबद्ध आणि आखीव रेखीव कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी शिरीष वंजारा,प्रा. संदीप बोबडे ,विजय निखाडे,अविनाश चोपडे, अरुण सांगळोदकर, मनोहर देशपांडे ,उमेश बाहेकर ,प्रवीण जायले, हरीश ढवळे, प्रवीण चोरे ,माधुरी सोळंके ,माधुरी थुटे ,सौ. वैशाली बिटोळे,सौ.रचना वंजारा ,युगेंद्र काळे ,शंतनु देशमुख, दिनेश कोकाटे, विजय बिहाळे ,सुधीर ठाकरे ,दर्शिका शेजपाल, मिना अरबट ,प्रा. मोहन सपकाळ, विशू विल्यम या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले .