
तेल्हारा प्रतिनिधी:-प्रजापीता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय तेल्हारा द्वारा आयोजित तणावमुक्त जीवनशैली तथा सफलता के सात कदम या विषयावर छत्तीसगड राज्यातील बिलासपूर येथील ब्रह्माकुमारीज परिवारातील सुप्रसिद्ध प्रवचनकार ब्रह्मा कुमारी राखी दीदी यांच्या सात दिवशीय प्रवचनमालेचे उदघाटन गुरुवारी 5 फेब्रुवारी ला सायंकाळी 6 वाजता स्थानिक लोकप्रिय आमदार प्रकाशजी भारसाखळे यांच्या हस्ते व अकोला-वाशिम ब्रह्माकुमारीज प्रमुख राजयोगिनी ब्रह्माकुमारी रुख्मिणी दीदी यांच्या अध्यक्षतेखाली थाटात संपन्न झाले.उदघाटन समारंभात तेल्हारा नगर परिषद च्या नवनियुक्त अध्यक्षा वैशालीताई पालीवाल व सर्व नगर परिषद सदस्यांचा ब्रह्माकुमारीज परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी खामगाव सेवा केंद्र संचालिका ब्रह्माकुमारी शकुंतला दीदी,रिसोड सेवा केंद्र संचालिका ब्रह्माकुमारी ज्योती दीदी, अकोला जिल्हा भाजपा उपाध्यक्ष श्री गजानन भाऊ उंबरकार, तेल्हारा भाजपा तालुका अध्यक्ष गणेश भाऊ रोठे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.उदघाटक म्हणून बोलताना आमदार प्रकाश भाऊ भारसाकळे यांनी आजच्या बदललेल्या सामाजिक परिस्थितीचा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात नकारात्मक परिणाम होत आहे. समाजातील घडणाऱ्या घटनामुळे मानसिक तणावामध्ये वाढ होत आहे. आजच्या भौतिक युगात सर्व सुविधा उपलब्ध असतानाही मनुष्य सुखी, समाधानी आणि आनंदी नाही त्यावरील उपाय शोधण्याच्या नादात अंधश्रद्धेचा बळी ठरत आहे परंतु ब्रह्मा कुमारीज अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने आत्मिक व अध्यात्मिक ज्ञान सांगून मनावर सकारात्मक विचाराने दुःख मुक्तीचा संस्कार देत आहेत. खऱ्या आनंदी आणि सुखी जीवनाची व्याख्या आणि परीकल्पना जगासमोर मांडण्याचे श्रेष्ठ कार्य ब्रह्माकुमारीज करीत असल्याचे मनोगत आमदार महोदयांनी व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना रुख्मिणी दीदींनी तेल्हारा ब्रह्माकुमारीज परिवाराचे विशेष कौतुक केले. प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्या साठी राजयोग द्वारा परमपिता शिव परमात्मा सोबत आपलासंबंध जोडून शक्ती प्राप्त करा व आपला जन्मसिद्ध अधिकार प्राप्त करा परमात्मा भारत भूमीवर येऊन 90 वर्ष झाले तो आपल्या मुलांनची सदगती करण्या साठी विकारा पासून मुक्ती देण्याचं कार्य करत आहे संचालिका प्रमिला दीदींच्या मार्गदशनाखाली सतत विविध सेवेच्या माध्यमातून होत असलेली सेवा आणि त्यासाठी मिळत असलेले सहकार्य यामुळे ईश्वरीय संदेश सर्वांपर्यंत पोहचविणे शक्य होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.मुख्य प्रवचनकार राखी दीदींनी पुढील सात दिवस उपस्थित राहून आत्मचिंतन केले तर तणावमुक्त झाल्याची अनुभूती सर्वाना होईल आणि तणावाचे अनेक दिवसापासून वाहत असलेले ओझे एकदम हलके होऊन सुखी जीवन जगण्याचा रस्ता सापडेल त्यामुळे अधिकाधिक संख्यने प्रवचनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. अतिशय नेत्रदीपक उदघाटक समारंभाच्या यशस्वीतेसाठी बिके ज्योती दीदी रिसोड, बिके विशाल भाई अकोला, बिके सुषमा दीदी खामगाव, बिके श्याम भाई तेल्हारा बिके वैष्णवी दीदी बि के आरती दीदी बि के गोपालभाऊ भुजबले व आभार बि के सतीशभाऊ धरमकर सह ब्रह्माकुमारीज परिवार तेल्हारा यांनी महत्वपूर्ण सहकार्य केले. संचालन ब्रह्माकुमारी सुषमा दीदी खामगाव यांनी तर स्वागत व आभार तेल्हारा सेवाकेंद्र संचालिका बिके प्रमिला दीदी यांनी केले.पुढील सातही दिवस आपल्या मित्र परिवारासह दररोज सायंकाळी 6 वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन प्रमिला दीदींनी केले आहे.