
तेल्हारा प्रतिनिधी :-
हिगणी मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा”टप्पा 3 या अभियानांतर्गत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला मा. अनिताताई मेश्राम यांचे अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय पथकाने नुकतीच जि. प. वरिष्ठ प्राथमिक शाळा हिंगणी बु येथे भेट दिली. यावेळी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी अनिताताई मेश्राम मॅडम यांनी शाळेतील विविध उपक्रमांची व भौतिक सुविधांची पाहणी केली, तसेच प्रत्येक वर्गाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी हसत खेळत हितगुज साधून विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांची शैक्षणिक प्रगती जाणून घेतली व शाळेच्या एकूण प्रगती बाबत समाधान व्यक्त केले याप्रसंगी त्यांचे सोबत मा. परिहार साहेब उप मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.अकोला मा. जितेंद्र प्रधान उपशिक्षणाधिकारी प्राथ. जिल्हा परिषद अकोला, मा. पागृत साहेब ग. शि. अ. बार्शी टाकळी,श्री मोरे साहेब वि. अ,श्री लहाने साहेब हे होते.तसेच प स स्तरावरील मा . अशोक जी बांगर साहेब ग. वि. अ. प स तेल्हारा,श्री रवींद्र चौथमल वि. अ. मो . अतहर परवेज ,के. प्र श्री शिवाजी तायडे, मु. अ श्री शैलेन्द्र डोसे, स. अ. श्री. नवनाथ कोरडे, सौ. सुरेखा भुजबले, कु.अनिता ठाकरे, कु. विजया खंडारे, श्री, गजानन मस्के तसेच सरपंच सौ सविताताई मांडवकर ग्रामसेवक श्री तळोकार आदी भेटी प्रसंगी उपस्थित होते.