
तेल्हारा प्रतिनिधी
तेल्हारा येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्रारा संचालित श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा येथे शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यासाठी स्वतःला सिद्ध करून घेण्यासाठी परिक्षा काळात तणाव निर्माण होते म्हणून त्यांना तणावमुक्त राहण्यासाठी वेळेचं नियोजन व व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन कु ऋतुंबरा शिरिष धोत्रे यांनी केले आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलास गांवडे मुख्याध्यापक हे होते. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केले आहे यावेळी विद्यार्थ्यांना तणावमुक्त जीवन ठेवण्यासाठी काळाची गरज आहे असे म़ोलाचे मार्गदर्शन केले आहे
कार्यक्रम चे सुञसंचालन शांतीकुमार सावरकर यांनी केले आहे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुनील वंजारी शिक्षक प्रतिनिधी, बळीराम कुवारे तूषार जाधव अंकेश भांबुरकर धनंजय भंगाळे बी जी पवार,भारत भोयर, श्रीधर लोखंडे, गाढवे सर अभिजित हिंगणकर सौ शर्वरी हिंगणकर कु प्रियंका नंदाने तेजराव कडू यांनी परिश्रम घेतले आहेत यावेळी उपस्थित सर्व मान्यवर मंडळी चे आभार कु खुशी शामसकार हिने मानले आहेत . यावेळी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वर्ग विद्यार्थी उपस्थित होते