
सोनमाळा दुर्गम भागातील शाळा सोनमाळा. लाखनी-
जि. प. उच्च प्राथमिक शाळा कोच्छी ता.लाखांदूर जी भंडारा येथे भंडारा जिल्हास्तरीय शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2025 26 दिनांक 31 जानेवारी एक व दोन फेब्रुवारीला पार पडला. पंचायत समिती लाखनी अंतर्गत येत असलेली जि प प्राथमीक शाळा सोनमाळा या शाळेच्या मुलीं प्रथम केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये प्रथम आल्या. त्यानंतर गुरढा येथे झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम येऊन त्यांनी जिल्ह्यामध्ये प्रवेश केला. जिल्ह्यामध्ये सुद्धा चमकदार कामगिरी करत त्यांनी प्राथमिक मुली कबड्डी मध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. शाळेच्या स्थापनेपासून 62 वर्षानंतर अशी कामगिरी करणारे ह्या मुली प्रथम ठरल्या त्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे खूप कौतुक होत आहे. 62 वर्षानंतर गावात जिल्ह्याची ट्रॉफी आल्यामुळे गावकऱ्यांनी या मुलींचे व शिक्षकांचे हार घालून स्वागत करून त्यांची गावांमधून मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी या यशाचे श्रेय मुख्याध्यापक श्री गुजर सर, जाधव सर व इटवले सर तसेच समस्त गावकरी सोनमाळा यांना दिले.