
चला पुन्हा शाळेचे दिवस
आठवूया’ या संकल्पनेवर आधारित दानापुर जनता विद्यालयातील सन 1994-95 च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. तब्बल 31 वर्षांनंतर जुने वर्गमित्र पुन्हा एकत्र येत शालेय आठवणींना उजाळा देण्याचा हा अनोखा सोहळा दोन जानेवारी रोजी कालंका माता मंगल कार्यालय दानापुर येथे आयोजित करण्यात आला होता.
यामध्ये सर्वप्रथम गावामधून ढोल ताशांच्या गजरात सर्व वर्गमित्र व मैत्रिणी यांनी डोक्याला फेटे बांधून कालंका माता मंदिरा पासून ते बस स्टॅन्ड जनता विद्यालय दानापुर अशी प्रभात फेरी काढली व तेथून शिक्षकांना घेत मंगल कार्यालयामध्ये प्रवेश केला त्यावेळी उपस्थित शिक्षक अरुळकार सर
मानकर सर, येवतकार सर व सावरकर सर डाबरे सर मात्रे सर समाधान हागे सर यांचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी फुलांचा वर्षाव करत मंच कावर नेले यानंतर माता सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून मान्यवरांनी प्रतिमेचे पूजन केले त्यानंतर शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना जुन्या आठवणीचा उजाळा दिला व आपले मनोगत व्यक्त केले. मुलींच्या वतीने मुलांना गिफ्ट देण्यात आले त्याचबरोबर मुलांनी सुद्धा मुलींना साडी व त्यांच्या आलेल्या पाहुणे जावई यांना शेला टोपी देण्यात विशेष करून म्हणजे मुलींना माहेर कडून जात असताना सोबत शिदोरी सुद्धा देण्यात आली
कार्यक्रमात शालेय जीवनातील गमतीजमती, अल्लड वयातील खोडकरपणा, शिक्षकांचा राग, परीक्षेतील यश-अपयश तसेच आंबटगोड आठवणी सहभागी विद्यार्थ्यांनी मनमोकळेपणाने सांगितल्या. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे मुलं व सीमेवर सैन्य दलात कार्यरत असलेले विद्यार्थ्यांचे सत्कार घेण्यात आला. कार्यक्रमात दिवंगत शिक्षक भड सर,बंडु विखे सर घोडे सर मंगळे सर माधवराव विखे सर व तसेच वर्गमित्र चार विद्यार्थी यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी विद्यार्थिनी नीता गौर यांनी आपले शिक्षणा बद्दल सर्वांना शिक्षणा चे महत्त्व काय असते हे आपल्या भाषणा तून सांगितले
स्नेहभोजना नंतर मेळाव्या ची सांगता झाली.
कार्यक्रमा चे सूत्र संचालन प्रमिला उंबरकर व विजया कुऱ्हाडे यांनी केले. स्नेहमिलन कार्यक्रमाला मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी सहकुटुंब उपस्थित होते. आभार प्रदर्शन विवेक थोरात यांनी मानले