
बुलढाणा : स्थानिक जिजामाता महाविद्यालय, बुलढाणा येथील बी.एस्सी. अंतिम वर्षाला शिक्षण घेत असलेले विद्यार्थी अभिषेक श्रीकृष्ण दिवाने, कु. स्नेहल राजेश तायडे व कु. साक्षी दिगंबर मोरे यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. श्री शिवाजी आर्टस्, कॉमर्स व सायन्स कॉलेज, अकोला यांच्या वतीने दिनांक २ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित बहुविद्याशाखीय विज्ञान आणि तंत्रज्ञानातील सीमांवर राष्ट्रीय विद्यार्थी परिषद (NSCFMST-2026) मध्ये त्यांनी पदवी बेसिक केमिकल अँड मटेरियल सायन्स या श्रेणीअंतर्गत भौतिकशास्त्र विषयातून पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
या विद्यार्थ्यांच्या यशामागे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन चांगोले, आयक्यूएसी समन्वयक डॉ. सुबोध चिंचोले, भौतिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. विकास पहुरकर तसेच प्रा. रामेश्वर बनकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.