
तेल्हारा तालुका प्रतिनिधी :-नंदकिशोर नागपुरे
दानापूर येथे संघर्ष क्रिकेट क्लब द्वारा आयोजित श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर चषक मा,युवानेते सुजातदादा आंबेडकर यांच्या वाढदिवसा निमित्त या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करण्यात आले. यावेळी
स्पर्धेतील प्रथम पारितोषिक ₹31,111 हे सुभाष रौदळे,माजी जि.प. उपाध्यक्ष व सौ सपना धम्मपाल वाकोडे सरपंच यांच्या वतीने देण्यात आले.
द्वितीय पारितोषिक ₹21111, हे. स्वर्गीय रामकृष्ण वानखडे यांच्या स्मृति पित्यार्थ महादेव राव वानखडे माजी सरपंच तसेच योगेश येऊल. ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने प्रदान करण्यात आले. तसेच तृतीय पारितोषिक प्रेस क्लब अध्यक्ष भगवान भाऊ हागे व माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल खोणे यांच्या कडून देण्यात आले वैयक्तिक पारितोषि कांचे ही वितरण करण्यात आले.
विजेता संघ: शिवनेरी क्रिकेट क्लब आकोट ..
उपविजेता संघ: . संत गजानन क्रिकेट क्लब शेगाव .
सर्व पारितोषि कांचे वितरण संबंधित बक्षीसदा त्यांच्या हस्ते करण्यात आले.
बक्षीस वितरण सोहळ्या चे अध्यक्ष स्थानी साहेबराव वाकोड़े माजी उपसरपंच होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुनील इंगळे प्रकाश खोब्रागडे नरेश बांगर जीवन बोदडे पंजाब तायडे संदीप कांबळे राहुल वाकोडे गोपाल विरघट संजय तायडे संतोष हागे श्री सुभाष रौदळे (माजी जि.प.उपाध्यक्ष) सौ. सपना धम्मपाल वाकोडे (सरपंच), अफसर खान (तंटामुक्ती अध्यक्ष), भगवान हागे (प्रेस क्लब अध्यक्ष, दानापूर) तसेच विनोद विरघट आयकर अधिकारी , महादेव वानखडे (माजी सरपंच) धम्मपाल वाकोडे राजेश उंबरकर मधुकर वाकोडे मंगेश पहुरकर अथर सौदागर असलम पठाण अमोल तायडे प्रमोद वाकोडे श्याम गवई फिरोज खान महेंद्र वाकोडे विजय वाकोडे सतीश तळोकार योगेश नाठे व गावातील सर्व मान्यवर खेळाडू उपस्थित होते.
कार्यक्रमा चे सूत्र संचालन राहुल वाकोडे यांनी तर आभार प्रदर्शन गोपाल विरघट यांनी मानले
कार्यक्रमा ची सांगता संघर्ष क्रिकेट क्लब दानापुर यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली.