
अकोट प्रतिनिधी : दिपक रेळे
अकोला जिल्ह्यातील अकोट येथे स्थानिक श्री शिवाजी महाविद्यालय अकोट येथे 1 फेब्रुवारी 2026 रोजी ऍड संतोष खवले यांनी छत्रपती शिवबा प्रतिष्ठान व युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने श्री दास गणू महाराज लिखित श्री गजानन विजय ग्रंथावर आधारित गणू गण गण गणात बोते ह्या महानाट्याचे आयोजन करण्यात केले होते. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून श्री नवनीत लाखोटिया,सौ मायाताई म्हैसने,ठाणेदार श्री अमोल माळवे, ठाणेदार श्री किशोर जुनघरे, श्री गोपाल मोहोड,श्री राहुल कराळे,मा नगराध्येक्षा मनीषा मते,श्री दीपक गोरे, श्री आनंद देशमुख,सौ अमृता खवले, श्री संतोष जगताप, सौ स्नेहा जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच कार्यक्रमांमध्ये कोरोना कालावधीमध्ये ज्या अधिकाऱ्यांनी अकोट शहरात शांतता आणि सुव्यवस्था टिकून राहण्याच्या दृष्टीने अतोनात प्रयत्न केले असे ठाणेदार श्री संतोष महल्ले, ठाणेदार श्री ज्ञानोबा फड,तहसीलदार श्री राजेश गुरव यांना यावेळेस शिव छत्रपती जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर गेल्या कित्येक वर्षापासून अकोट शहरांमध्ये तन-मन धनाने वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सेवा देत असणारे. ह. भ.प सत्यपाल महाराज श्री राजेश नागमते, डॉ.अमोल राजगुरू,श्री नवीन चांडक साहेब,ऍड संदीप वालशिंगे ऍड.सुशील खवले,श्री जगन्नाथजी धर्मे, पत्रकार श्री संजय आठवले,श्री रामदास काळे,श्री विजय शिंदे, श्री हिम्मत दंदी, श्री राजीव खारोडे सर,श्री कैलास वर्मा सर , विशाल कुलट सर यांना या वेळेस अकोट भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर प्रसिद्ध रील स्टार अभिनेता विजय खंडारे अभिनेत्री तृप्ती खंडारे, आदिराज घनघाव व युवराज घनघाव जालनाकर,अभिनेता श्रीवेश देशमुख,अभिनेत्री स्टेफी प्यारेजी या सर्वांना महाराष्ट्र कला भूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमांमध्ये अकोट शहरात नव्याने पार पडलेल्या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने निवडून आलेले श्री दिलीप बोचे, सौ विजया बोचे,श्री सुशील पुंडकर, सौ सुनीता महल्ले,श्री संतोषजी झुंनझुनवाला यांना नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर श्री दासगणू महाराज यांनी लिहिलेल्या श्री गजानन विजय ग्रंथावर आधारित श्री संत गजानन महाराज यांच्या जीवनावर आधारित 21 अध्याय दोनशे कलावंतांनी प्रत्यक्षरीत्या व्यासपीठावर सादर केले त्यावेळेस गजानन महाराजांच्या लीला पाहत असताना हजारो भाविक मंत्रमुग्ध झाले कार्यक्रमाच्या शेवटी हजारो नागरिकांनी श्री संत गजानन महाराजांची सामुहिक महाआरती केली व अतिशय भक्तीमय वातावरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष श्री वैभव जगताप, श्री प्रमोद सोनोने, कोषाध्यक्ष निखिल वानखडे,वंश दांदळे,त्याचबरोबर श्री मनोज देशमुख, महेश वाघ,गणेश नारे, निर्भय पळसकर, प्रा. प्रवीण बोंद्रे परवेज अली, साजिद शेख, विष्णू अवंडकर, सौ अपेक्षा अवंडकर,सौ कामिनी बोडखे, सौ कविता कान्हेरकर, स्वप्निल बोबडे, वंदना बोबडे, अजिंक्य गोरे, सागर वाघमारे,गजानन शेंडे,उमेश वाघ, विकी नारे, विठ्ठल बोबडे, प्रवीण इंगळे,सागर मानकर, गजानन कोलखेडे, विठ्ठल कळस्कर, विष्णू मेतकर, मंगेश राठोड, अतुल अढाऊ, गोलू जगताप, विक्रम रामागडे,अजय लांडे, अविनाश पुंडकर,प्रफुल ओम्बसे, आकाश खवले,पवन ठाकरे,श्याम खवले,नरेश पुनकर,राम वरणकार,किशोर ब्राह्मणकर,अशोक खवले, पवन मोरे, संतोष कळसकर,संतोष निमकर,अक्षय नाचणे,संजय बोरडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाचे आयोजक ॲड.संतोष गजानन खवले व कार्याध्यक्ष श्री वैभव जगताप यांनी सर्व सहकाऱ्यांचे व उपस्थितांचे आभार मानले.