
राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी:-
अमरावती जिल्हा धारणी तालुका दुनी गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये करण्यात आलेले पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे तसेच रंगरंगोटीचे काम नियोजित आराखड्यानुसार व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण झाले आहे. सदर कामाची पाहणी शाळा व्यवस्थापन समितीने केली असून काम योग्य दर्जाचे व समाधानकारक झाल्याबाबत ठराव संमत करण्यात आला आहे.
या पाहणीवेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. विनोद उइके, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री. रमेश अढागळे व इतर सदस्य उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक श्री. सागर काकडे सर व अमृते सर यांनीही कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
शाळेच्या आवारातील पेव्हिंग ब्लॉकमुळे परिसर स्वच्छ, सुरक्षित व सुटसुटीत झाला असून रंगरंगोटीमुळे शाळेच्या इमारतीचे सौंदर्य वाढले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आनंददायी व प्रेरणादायी शैक्षणिक वातावरण मिळणार आहे.
सदर कामास ग्रामपंचायत सदस्य सौ. मंदाताई जिराफे व श्री. रविंद्र मारस्कोले यांनी भेट देऊन पाहणी केली असून काम योग्य व दर्जेदार झाल्याबाबत त्यांनी दुजोरा दिला आहे. तसेच समस्त गावकरी यांनीही या विकासकामाबाबत समाधान व्यक्त केले आहे.
या विकासकामामुळे शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला याचा निश्चितच लाभ होईल, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.