
तेल्हारा प्रतिनिधी:-
तेल्हारा शहरातील संत रविदास महाराज समाज मंदिर मधील विविध समस्येबाबत आज चर्मकार समाज बांधव यांच्या कडुन निवेदन देण्यात आले.
तेल्हारा शहरातील एकमेव श्री संत रविदास महाराज समाज मंदिर येथे सभागृह असुन या सभागृहाची अत्यंत बिकट दुरावस्था झाली या सभागृहात गोरगरिब नागरिकांचे कार्यक्रम पार पडतात पण आता हे सभागृह शिकस्त झाले असुन त्यात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.या सभागृहात चर्मकार समाज बांधवांच्यावतीने विविध कार्यक्रम पार पडत असतात त्याच बरोबर या परिसरातील हे एकमेव मंगल कार्यालय असुन या ठिकाणी परिसरातील नागरिकांचे सुद्धा विविध लग्न प्रसंग व इतर कार्यक्रम करीता या सभागृहाच्या उपयोग सुरू होता पण मागील अनेक वर्षांपासून नगर परिषद प्रशासनच्या दुर्लक्षतेमुळे या सभागृहाची बिकट परिस्थिती झाली आहे .
ह्या सभागृहाची इमारत 1983 पासुन उभारलेली असुन ही इमारत सुद्धा शिकस्त झाली आहे त्यामुळे येत्या काळात एखादी दुर्घटना घडल्याची शक्यता सुद्धा नाकारत येत नाही . या सभागृहातील संत रविदास महाराज यांची मंदिर सुद्धा शिकस्त झाले असुन महाराजांची मूर्ती सुद्धा खंडित झाली आहे त्यामुळे श्री संत रविदास महाराज जयंती निमित्ताने समाज मंदिराची साफ सफाई करण्यात यावी. सद्यस्थितीत ह्या समाज मंदिराची इमारत शिकस्त झाली असुन ती पाडुन नवीन सुसज्ज इमारत उभारण्यात यावी.या समाज मंदिराच्या देखरेखकरिता संत रविदास महाराज चर्मकार समाजा कडे देण्यात यावी.
या समाज मंदिर येथे स्थापन केलेली संत शिरोमणी यांची मूर्ती खंडित झाली असुन ह्या मूर्तीच्या जागी नवीन मार्बल ची मुर्ती बसविण्यात यावी .
ही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात येत आली आहे यावेळी मोठया संख्येने चर्मकार समाज बांधव उपस्थित होते