
अकोट ता. प्रतिनिधी:- प्रभाकर बोरकर
चौहटा बाजार परिसरामध्ये एक नावलौकिक असलेलं देवालय म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी ट्रस्टच्या वतीने विविधसांस्कृतिक देशभक्तीपर कार्यक्रम व महापुरुषांच्या जयंती महोत्सव व सालाबाद प्रमाणे साजरा करण्यात येतात आसरा माता यांचा नवरात्रीचा कार्यक्रम सुद्धा गावच्या पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने व भाविक भक्तांच्या वतीने खूप मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येतो तेव्हा हजारो भाविक भक्तांची या महाप्रसादाकरिता हजेरी लागते.
काही दिवसाआधी गांधीग्रामच्या पूर्णानदी तीरावर गणमांन्य व्यक्तींच्या हस्ते संस्थेच्या माध्यमातून ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पाडण्यात आले. श्री आसरा माता देवी ट्रस्ट च्या वतीने अनेक धार्मिक कार्यक्रम पार पाडतात 26 26 2026 चा 77 वा गणराज्य दिन ट्रस्टच्या वतीने साजरा करत नंदू भाऊ राणेसरपंच ग्रामपंचायतचौहटाबाजार यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला तेव्हा ट्रस्टचे सर्व सदस्य व गावातील आमंत्रित मंडळी या ध्वजारोहणाला उपस्थित राहिली. देशभक्ती सेवा संघाच्या अध्यक्ष सौ आशाताई प्रल्हादराव वावरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ध्वजारोहण पार पडले