
तेल्हारा/प्रतिनिधी:-प्रजापीता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय तेल्हारा च्या वतीने दि. 5 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी या सात दिवसात दरररोज सायंकाळी 6 ते 7:30 वाजेपर्यंत “तणावमुक्त जीवन एवं सफलता के सात कदम” या विषयावर छ्तीसगड राज्यातील बिलासपूर येथील सुप्रसिद्ध प्रवचनकार ब्रह्माकुमारी राखी दीदी यांचे विशेष प्रेरणादायी प्रवचन आयोजित केले आहे.धावपळीच्या युगात काही आनंदाचे क्षण शोधण्यासाठी या दिवसात आनंदी राहण्याची जीवनशैली अनुभवण्याची आणि आनंदी क्षण प्रत्यक्ष जीवनात उतरविण्याची मोठी संधी तेल्हारा वासियांना मिळणार आहे. दररोज च्या नित्य दिनचर्येंतून सायंकाळी दीड तास वेळ काढल्यास प्रत्येकाच्या जिवनात अमूलाग्र बदल घडून येईल. आध्यत्मिक ज्ञान आजच्या वैज्ञानिक युगात किती आणि कसे महत्वाचे आहे याचे शास्त्रीय विवेचन आणि विश्लेषण ब्रह्माकुमारी राखी दीदींच्या सुमधुर वाणीतून एकण्यास मिळणार आहे. 5 ते 11फेब्रुवारी या सात दिवसात जीवनातील अनेक समस्यावर समाधान शोधन्याचा प्रयत्न केला जाईल. 5 फेब्रुवारी पहिल्या दिवशी “तणावमुक्त कार्यशैली” 6 फेब्रुवारीला “स्वयं की पहचान”, 7 फेब्रुवारी तिसऱ्या दिवशी “रिलेशनशील मानजमेंट और टीम वर्क”, 8 फेब्रुवारी “निर्णयशक्ती और नेतृत्व क्षमता” 9 फेब्रुवारी पाचव्या दिवशी “वर्क लाईफ बॅलन्स” 10 फेब्रुवारीला “डिजिटल डिटॉक्स” व 11फेब्रुवारी सातव्या दिवशी “मौन की परिभाषा” हे सात दिवसाचे सात विषय म्हणजे आनंदी, समाधानी आणि खुश राहण्यासाठी सात कदम असणारे आहेत. राखी दीदी यांच्या कर्यक्रमातून अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडले असून आपणही जर कोणत्याही कारणाने स्वतःला किंवा परिवाराला दुःखी समजत असाल, विनाकारण च्या चिंतेने त्रस्त असाल किंवा स्वतःतील उणीव, कमतरता यामुळे स्वतःला अपयशी समजत असाल तर आपण नक्की या सात दिवसाच्या प्रवचनमालेचा न चुकता लाभ घ्यावा असे आवाहन तेल्हारा ब्रह्माकुमारीज सेवा केंद्राच्या संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी प्रमिला दीदीजी यांनी केले आहे