
राज कुमार चिंचोळकर:- पातुर तालुका प्रतिनिधी
पातूर तालुक्या तील सस्ती येथील श्री सं.ल.शिंदे विद्याल यात दरवर्षी प्रमाणे वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा ‘सांस्कृतिक कार्यक्रम’ मंगळवार २७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करून उद्घाटन थाटात साजरा करण्यात आला आहे.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती पातूर चे प्रवीण डाबेराव,
उद्घाटक म्हणून पोलीस उपनिरीक्षक, पोलीस स्टेशन चान्नी चे रविंद्र लांडे,प्राचार्य सुभाष पातोंड, अध्यक्ष
गिरीश शिंदे, कोषाध्यक्ष अरविंद शेळके,उपाध्यक्ष संतोषराव पाठक,सचिव मोहनराव बदरखे, डॉ.अनिल निखाडे, मधुकरराव वाकचवरे,अशोकराव देशमुख,प्रभाकरराव पाठक,
सचिनजी वाकचवरे, सर्व पदाधिकारी तथा संचालक
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ तसेच श्री.सं.ल.शिंदे प्रायमरी स्कुल चे मुख्याध्यापक धनंजय ज्ञा. बंड, संयोजिका स्मिता वानखडे तर संचालन विद्यालयाचे स्नेहसंमेलन संयोजक नितीन काळे, आभार पयवेक्षक बोरोकार यानी केले.या कार्यक्रमाला मान्यवर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.