
तेल्हारा तालुका प्रतिनिधी :- नंदकिशोर नागपुरे
तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत भवनात गावकरी, विद्यार्थी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत सरपंच सौ.सपना धम्मपाल वाकोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
स्वर्गीय नारायणी देवी शहा कनिष्ठ महाविद्यालय व सहकार विद्या मंदिर, दानापूर येथे राधेश्यामजी शहा यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. हनुमान प्रसाद साह जनता विद्यालय, दानापूर येथे इयत्ता नववीची विद्यार्थिनी गायत्री निलेश वायडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
महावितरण शाखा, दानापूर येथे कनिष्ठ अभियंता अक्षय शेरकी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा (मुले) येथे मुख्याध्यापक प्रमोद वडोदकार यांच्या हस्ते, तर जिल्हा परिषद कन्या शाळेत मुख्याध्यापक मिलिंद खिराळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्र, दानापूर येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. आयशा शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी डॉक्टर, नर्स व अन्य कर्मचारी उपस्थित होते.