
तेल्हारा प्रतिनिधी :-
बौद्ध समाज तेल्हारा शहर आणि तालुक्याच्या वतीने केली पालक मंत्री महाजन यांचेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
आनंद बोदडे तेल्हारा प्रतिनिधी: – 26 जानेवारी 1950 ला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधान आपल्या देशात लागू झाले आणि आपला भारत देश प्रजासत्ताक देश म्हणून घोषित झाला. दर वर्षी 26 जानेवारी हा दिवस संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिवस म्हणून आपण साजरा करतो, ह्यानिमित्ताने भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार यांना आपण अभिवादन करतो. परंतु काल दि 26 जानेवारी 2026 ला नासिक येथे आपले मंत्री गिरीश महाजन ह्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त संबोधित करतांना जाणीवपूर्वक भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे नाव टाळले, हे फक्त त्यांनी जातीय द्वेषातून केले त्यामुळे अशा जातीयवादी मंत्र्याला आपण तात्काळ आपल्या मंत्रिमंडळ मधून हकालपट्टी करावी व त्यांच्यावर अट्रोसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी निवेदन सादर केले निवेदनावर विनोद पोहरकर,विकास पवार,सचिन पोहरकार संघर्ष बोदडे,अक्षय दामोदर,प्रताप गव्हांदे , प्रवीण पोहरकर शेख दाऊद पी.पी. पोहरकर, सचिन खिराडे, मनोहर गवारगुरू अशोक तायडे पंकज उमाळे. विलास दामोदर अक्षय गव्हांदे दीपक पोहरकर सदानंद मोरे यांच्या सह्या आहेत