
अकोट तालुका :-प्रतिनिधी प्रभाकर बोरकर
स्वामी विवेकानंद कॉन्व्हेंट देवरी फाटा येथे संस्थेचे सचिव डॉ प्रमोदराव चोपडे यांनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला . तेव्हा लहान चिमुकल्यांनी भारतीय तिरंग्याला मानवंदना दिली. एक सुरेली आवाज मध्ये भारत मातेचे राष्ट्रीय गीत विद्यार्थ्यांच्या गोड आवाजामध्ये पार पडलेसंस्थेतील सर्व पदाधिकारी प्रामुख्याने हजर होते. त्याचप्रमाणे पालक वर्ग मोठ्या प्रमाणात हजर होता. संस्थेतील कर्मचाऱ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाची विद्यार्थ्यांकडूनजबरदस्त तयारी केली होती त्या अनुषंगाने विविध कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा कॉन्व्हेंट मध्ये करण्यात आले होते.
अनेक चिमुकल्यांनी थोर महापुरुषांच्या व वीरांच्या वेशभूषा धारण केल्या होत्या. देवरी फाटा परिसर हा देशभक्तीपर गीतांच्या व जयघोषाने आणिमहापुरुषांच्या आठवणींनी गजबजून गेला होता. या कार्यक्रमांमध्ये देशभक्तीपर अनेक गीत सादर करण्यात आले त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांकडून वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला स्थानिक कर्मचारी वर्गाने विद्यार्थ्यांकडून आणि देखावे सुद्धा तयार केले होते. तसेच प्रमुख आकर्षण म्हणून वीर भगतसिंगाचा ड्रामा हा महत्त्वपूर्ण ठरला. शालेय अभ्यासा मध्ये प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तेजनात्मक सर्टिफिकेट व मेडल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले स्पर्धांमध्ये मुलांच्या कवायतव छोटेखानिसांस्कृतिक कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आजचा कार्यक्रम संपन्न केला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुमारी ऐश्वर्या पाटील व राऊत मॅडम यांनी केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजेश खोटेरे प्राध्यापक मुंबई त्याच प्रमाणे पालक प्रतिनिधी गोपाल दामोदर, स्वामी विवेकानंद कॉन्व्हेंटच्या प्राचार्य शुभांगी ताई बंड ,सौ गावंडे मॅडम ,डिक्कर मॅडम, साबळे मॅडम, फोकमारे मॅडम लबडे मॅडम व शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग प्रामुख्याने कार्यक्रमाला हजर होता