
तेल्हारा प्रतिनिधी :- तेल्हारा तालुक्यातील आदर्श ग्राम पाथर्डी येथे श्री संत गजानन महाराज प्राथमिक शाळा व श्री संत गजानन महाराज कनिष्ठ महाविद्यालय पाथर्डी येथे 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला ज्ञानगंगा व्यायाम क्रीडा शिक्षण व बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री सुरेशदादा गुजर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कॉलेजचे प्राचार्य श्री गायकवाड सर व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक शिक्षक व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते